भात

गर्मीचा ताण

Thermal stress

इतर

थोडक्यात

  • फुलांचे पुंजके पांढरे, कोमेजलेले असतात.
  • भाताची पाने मुडपतात आणि भाजल्यासारखी दिसतात.
  • अत्यंत कमी व बारिक फुटवे येतात. ओंब्या दाणेविरहित असतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

भात

लक्षणे

उन्हाळ्याच्या ताणाची भातावरील लक्षणे ही भाताच्या पिकाच्या टप्प्यांवर अवलंबुन आहेत. सुरवातीला ह्यामुळे वाळलेला रोप आणि खूप कमी फुटवे येतात. पाने वरती मुडपतात आणि भाजल्यासारखी दिसतात. फुलधारणेच्या काळात, फुलांचे पुंजके पांढरे होतात आणि आक्रसल्यासारखे दिसतात, जे परागकण कमजोर असल्याचे दर्शवितात. जेव्हा भाताचे दाणे तयार होऊ लागतात, तेव्हा गर्मीमुळे विकसन पूर्ण होत नाही. ह्याचा मुख्य परिणाम आहे कि गर्मीच्या ताणामुळे काढणी केलेल्या भाताच्या दाण्यांची संख्या आणि प्रत दोन्ही कमी भरते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

ही समस्या किडींमुळे वा रोगांमुळेही उद्भवत नाही; म्हणुन जैविक नियंत्रणाची आवश्यकता आणि संबंधही नाही.

रासायनिक नियंत्रण

ही समस्या किडींमुळे वा रोगांमुळेही उद्भवत नाही; म्हणुन रसायनिक नियंत्रणाची आवश्यकता आणि संबंधही नाही.

कशामुळे झाले

पिकाला वाढीसाठी, विकसनासाठी आणि योग्य प्रजननासाठी आवश्यक असणार्‍या तापमानापेक्षा जेव्हा अधिक तापमान होते तेव्हा अशा प्रकारचा ताण येतो. जरी दिवस आणि रात्रीचे तापमान दोन्ही गर्मीचा ताण देऊ शकतात, तरी रात्रीच्या तापमानाचा प्रभाव हा दिवसाच्या तापमानापेक्षा अधिक वाईट असतो. ह्या समस्येचे प्रमुख कारण हवामानातील बदल आहे जो सध्यातरी अधिकाधिक सर्वसामान्य होत आहे. म्हणुनच हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे कि खूप जास्त गर्मी आणि पुरेसे पाणी नसणे यामुळे ही समस्या होऊ शकते.


प्रतिबंधक उपाय

  • लवकर तयार होणारे भाताचे वाण लावा किंवा मोसमात उशीरा भाताची लागवड करा जेणेकरुन महत्वाच्या प्रजनन टप्प्यावर येणार्‍या उन्हाळी झळा टाळता येतील.
  • लवकर तयार होणारा भात, ह्या प्रजननाच्या संवेदनशील टप्प्यावरुन, तीव्र उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच पार होतो तर उशीरा लागवड केल्याने प्रजननाचा टप्पा हा तीव्र उन्हाळ्याच्या नंतर येतो, ज्यामुळे टोकाच्या तापमानातुन पीक सुरक्षित रहाते.
  • जमिनीचा पोत सुधारण्यासाठी योग्य ती मशागत करा, ज्यामुळे मुळांना पाणी आणि अन्नद्रव्ये जास्त प्रभावीपणे शोषता येतात.
  • खासकरुन गर्मीच्या झळांच्या काळात झाडांना पाणी द्या.
  • आपण देणार असलेल्या एकुण नत्राच्या छोट्या मात्रा करुन वेगवेगळ्या वेळी द्या.
  • जेव्हा आपण नत्र थोडे-थोडे करुन देता तेव्हा काही भाग हा फोकून खतासारखा द्या जेणेकरुन ते जमिनीत एकसारखे आणि हळुहळु मिसळेल.
  • जमिनीचा पोत सुधारण्यासाठी खोल मशागत करा म्हणजे वरची माती आणि खालची माती एकजीव होतील.
  • जमिनीचा पोत सुधारण्यासाठी मशागत करताना सेंद्रीय सामग्रीही द्या.
  • ह्यामुळे वाढीची चांगली परिस्थिती निर्माण होऊन झाडांवर उन्हाळ्याचा ताण सहन करण्याची ताकद येईल.

प्लँटिक्स डाऊनलोड करा