Physiological Disorder
इतर
पानांच्या दोन्ही बाजुंना फिकट हिरवे ते पांढरे आडवे भाग दिसतात. हे रंगहीन पट्टे जुन्या पानांच्या बुडाशी दिसतात आणि हळुहळु जवळपासच्या कोवळ्या पानांवरही दिसु लागतात. शेतात, लक्षणे जमिनीपासुन एकाच उंचीवर असणार्या विविध झाडांवर पाहिली जातात. काही प्रभावित पानांत वाळलेले डाग आणि गळ या धब्ब्याच्या किंवा पट्ट्यांच्या आत दिसते. छोटे कांडे बहुधा या विकृतीपासुन मुक्त असतात.
आजतागायत या विकाराविरुद्ध कोणतेही जैविक नियंत्रण माहितीत नाही.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. याचे नुकसान हे लक्षणीय नसल्याने झाडाला प्रभावित करीत नाही.
वाळलेले पट्टे हा एक भौतिक विकार आहे जो प्रामुख्याने तापमानात अचानक घट झाल्यामुळे होतो. हा विकार न उमललेल्या पानांच्या भागांना प्रभावित करतो. जेव्हा काही अठवड्यांनंतरच पाने पूर्णपणे उमलतात तेव्हाच नुकसान दिसते आणि याचा फारसा मोठा परिणाम पिकाच्या उत्पन्नावर तसेच इतर प्रणालींवर होत नाही. २.७ ते ७ अंश तापमान या विकारास अनुकूल असते. डोंगरावरील शेतीखालील भाग, खोर्यातील शेतांपेक्षा जास्त प्रभावित होतात. काही संवेदनशील वाणांत, खासकरुन ज्या वाणांची पाने नैसर्गिकत:च वाकलेली असतात, त्यात उष्णतेमुळेही हा विकार दिसुन येतो.