कापूस

तणनाशकामुळे नुकसान

Herbicides Cell Membrane Disruptors

इतर

थोडक्यात

  • पानांवर पाणी शोषल्यासारखे ठिपके आढळतात.
  • झाडी वाळते आणि मर होते.

मध्ये देखील मिळू शकते


कापूस

लक्षणे

कोणते तणनाशक वापरले आहे, वापराची वेळ आणि मात्रा यावर लक्षणे अवलंबुन असतात. बहुधा पानांवर पाणी शोषल्यासारखे डाग येतात जे नंतर वाळतात. झाडाचे भाग भाजणे किंवा फुटवे न होणे हे उगवणीपूर्वीच्या तणनाशकाचे वैशिष्ट्य आहे. जर ऊगवणीनंतरचे तणनाशक वापरल्यास भाजणे हे विखुरलेल्या ठिपक्यांच्या स्वरूपात आढळते. ह्याची गल्लत पॅराक्वाट जखमेसह होऊ शकते पण त्यात तांबट मलीनता दिसते

शिफारशी

जैविक नियंत्रण

या परिस्थितीसाठी कोणतेही जैविक उपचार उपलब्ध नाहीत. प्रतिबंध आणि शेतीच्या चांगल्या सवयींनी नुकसान न होऊ देणेच योग्य आहे. जर मात्रा जास्त झाली अशी शंका असेल तर झाडाला पाण्याने पूर्ण धुऊन काढावे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. तणनाशकांची फवारणी योजना करण्यापूर्वी आपण कोणते तण (मूळत: रुंद पानांचे विरुद्ध गवती) हाताळत आहात याची खात्री करा तसेच या हेतुसाठी इतर कोणती पद्धत जास्त योग्य असु शकते का हे ही पहा. तणनाशक काळजीपूर्वक निवडा, त्यावरील लेबल काळजीपूर्वक वाचा आणि सूचना तसेच मात्रांचा वापर त्यावर लिहिल्याप्रमाणे तंतोतंत करा.

कशामुळे झाले

पीपीओ अवरोधकांच्या तणनाशकांनी नुकसान उद्भवते ज्यात येतात फ्ल्युमिॉक्झॅझिन, फोमेसेफेन, लॅक्टोफेन, कार्फेन्ट्राझोन, अॅसिफ्ल्युयॉरफेन जे डायफेनिले इथर्स कुटुंबातील आहेत. हे इतर नुकसानासह पानांतील हरितद्रव्यच्या उत्पादनात बाधा आणुन पेशींचे आवरण खराब करतात. पानांवरील लक्षणे १-३ दिवसांनी तेही ऊन आणि हवामान परिस्थितीप्रमाणे दिसतात. लक्षणे विकसित होण्यासाठी प्रकाशाची गरज असते आणि गरम व ऊबदार वातावरणात ते आणखी तीव्र होतात.


प्रतिबंधक उपाय

  • कोणते तण (मूळत: रुंद पानाचे किंवा गवती तण) आपण हाताळत आहात याची खात्री करा.
  • आपल्या हेतुसाठी उचित असे तणनाशक काळजीपूर्वक निवडा.
  • लेबल काळजीपूर्वक वाचून त्यावरील सूचनांचे, मात्रेचे पालन तंतोतंत करा.
  • दुसऱ्या तणनाशकामुळे होणारी दूषितता टाळण्यासाठी वापरल्यानंतर नेहमीच फवारा स्वच्छ करा.
  • आजूबाजूच्या शेतात वार्‍याने औषध उडुन नये म्हणुन जास्त वारा असताना फवारणी करणे टाळा.
  • तण चांगल्याप्रकारे लक्षित करण्यासाठी तणनाशकाचे द्रावण वाऱ्याने कमी वाहन करणारे नोझल वापरा.
  • तणनाशकाचा परिणाम तपासण्यासाठी कुरणात आणि गवताळ भागात फवारणी करून बघा.
  • हवामानाचा अंदाज काळजीपूर्वक तपासा आणि गरम व उबदार वातावरणात फवारणी करु नका.
  • प्रत्येक वापराची तारीख, उत्पाद, क्षेत्र आणि हवामान परिस्थिती याची नोंद ठेवा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा