लिंबूवर्गीय

लिंबुवर्गीय पिकांचे वार्‍‍यामुळे नुकसान

Wind Damage on Citrus

इतर

थोडक्यात

  • दूरदृष्टीने पाहता, वारा झाडाच्या वाढीत, शारीरिक रचनेत आणि आकारात फरक आणु शकतो.
  • भौतिक नुकसानात फांद्या तुटणे, फळे खरबडीत होणे आणि उन्हाने करपणे ज्यामुळे व्रण पडणे आणि पेशी नष्ट होणे होते.
  • गंभीर प्रकरणात, फळे कमी लागतात, प्रतीवर प्रभाव पडतो आणि उत्पादनाच्या नुकसानाची अपेक्षा केली जाऊ शकते.

मध्ये देखील मिळू शकते


लिंबूवर्गीय

लक्षणे

वार्‍‍यामुळे नुकसानीच्या लक्षणांची गल्लत पुष्कळदा फुलकिड्यांच्या नुकसानाबरोबर केली जाते. कोवळ्या रोपांची वरील मुळे आणि जमिनीलगतची साल, वाळुच्या वादळामुळे व्रण दर्शविते. पान आणि फांद्यावरील ओरखडेही व्रणामुळे होतात पण नुकसान फार जास्त सूचक असते. वाढ दर आणि उत्पादन वार्‍याच्या ताणाने कमी होते, जे जी झाडे वार्‍याला सामोरी जातात त्यात कमी किंवा काहीच फळे न लागण्याने दिसुन येते. हंगामात नंतर कोवळी फळे (८ सें.मी. व्यासाची) ही वार्‍याच्या नुकसानास फारच संवेदनशील असतात. एकेकटे किंवा जास्त आडवे किंवा तिरके राखाडीसर व्रण पूर्ण सालीवर दिसतात. फुलकिड्याच्या नुकसानाच्या तुलनेत, वार्‍याच्या ताणात फळांचे स्वच्छ छोटे भाग दिसतात तर फुलकिड्यांचे व्रण सलग असतात. जोरदार वार्‍याने फांद्या तुटु शकतात आणि वाकतात किंवा झाडच मुळापासुन उखडते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

पहिल्यांदा नुकसानाचे अवलोकन करा. वाढीचा टप्पा आणि नुकसान याप्रमाणे झाडाला वाचवु शकतो का ते ठरवा. नुकसानीत फांद्या आणि फळे खुडुन किंवा छाटणीच्या उपकरणांनी काढा. खास ओल्या हवामानात, जिवाणू आणि बुरशींपासुन वाचण्यासाठी सेंद्रिय थर द्या.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. वाढीचा टप्पा आणि नुकसानाची गंभीरता यावर उपचार अवलंबुन असतात. गंभीर प्रकरणात, उपचार हे बुरशी आणि जिवाणूजन्य रोगांच्या प्रतिबंधासाठी केले जातात, उदा. नुकसानीत फांद्या छाटणे आणि त्याठिकाणी बुरशी आणि जिवाणूविरोधक थर देणे.

कशामुळे झाले

वार्‍यामुळे लक्षणे उद्भवतात, आणि खासकरुन वार्‍याच्या अडथळ्याविना असलेल्या असुरक्षित भागात हा चिंताजनक विषय आहे. जर वारा वारंवार आणि/किंवा जोरदार असला, तर लिंबुवर्गीय पिकांची टक्केवारीची मोठ्या प्रमाणावर प्रत कमी भरते किंवा अमान्य केली जाते. कोवळ्या फळांवरील चिन्हे जुनी पाने वार्‍यामुळे जोरात पृष्ठभागावर घासल्याने तयार होतात. रंगहीनता येते कारण फळांभोवती संरक्षक, खरबडीत कवच तयार होते. एकदा का फळ सुमारे ३ सें.मी. मापाचे झाले, साल जाड झाली तर त्यावर सुक्या काटक्या आणि फांद्यांमुळे ओरखडे उमटतात. पेशींना झालेले नुकसान हे जिवाणू आणि बुरशींना आत शिरुन घर करुन जास्त नुकसान करण्याची संधी देतात. खास करुन कोरडा वारा झाडाला पानगळ, वार्‍याने करपणे, आणि खरचटणे करुन नुकसान करतात आणि बहुतेक वेळा अखेरीस पाने वाळतात आणि फळांवर ओरखडे उमटतात.


प्रतिबंधक उपाय

  • वार्‍याचा वेग, दिशा आणि पुनरावृत्तीची रचना ध्यानात घेऊन कायम स्वरुपी किंवा कधीमधी अडथळे निर्माण करावेत.
  • वार्‍याच्या दिशेने झाडे लावावीत.
  • झाडांचे रक्षण करण्यासाठी वार्‍याच्या अडथळ्यांत दुरुस्ती आणि व्यवस्थापन करावे.
  • वार्‍याचा अंदाज असल्यास जमिनीतील आर्द्रता जास्त राखावी.
  • मोठे नुकसान झाल्यानंतर नविन फुटवे धरण्यासाठी अतिरिक्त नत्राची मात्रा देण्याचा विचार करावा.
  • खूपच जास्त वारा किंवा वार्‍याची दिशा बदलल्यास, जास्त अडथळे लावा.
  • वार्‍याची मुख्य दिशा लक्षात घेऊन निवडक छाटणीची शिफारस केली जाते.
  • तसेच काढणीनंतर पुढच्या हंगामात नुकसान होऊ नये म्हणुन मृत लाकडाचीही छाटणी करण्यास विसरु नये.

प्लँटिक्स डाऊनलोड करा