काकडी

काकडीचे वार्‍याने नुकसान

Wind Damage on Cucumber

इतर

थोडक्यात

  • वार्‍यामुळे काकडीची वाढ, आकार आणि झाडाच्या रचनेत बदल घडु शकतो.
  • भौतिक नुकसानामध्ये पान गळ आणि वाळुच्या वादळाने झाडी ठिसुळ आणि कोरडी होते.
  • गंभीर प्रकरणात, फळे कमी लागतात आणि प्रतिवर प्रभाव पडतो, ज्यामुळे पिकाचे नुकसान होते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

काकडी

लक्षणे

लक्षणे गंभीर दुष्काळ परिस्थितीत लागवड केलेल्या झाडांसारखीच दिसतात. नुकतेच पेरलेली बियाणे जोराचा वारा सुटल्यास जमिनीतुन ऊडुन जातात. नविन उगवून आलेली रोपे वाळुच्या कणांनी (वाळु वादळात) प्रभावित होण्यास संवेदनशील असतात. जुन्या झाडात, पाने जोरदार सतत वार्‍याच्या झोतामुळे मरगळतात, अखेरीस कोरडी आणि ठिसुळ होतात. झाडीतही शिरांमधील करपणे आढळते आणि गंभीर प्रभावात झाडी फाटते किंवा फुटते. जर वार्‍याच्या सतत ताणाखाली झाडे राहिली त्यांची वाढ खुंटते. हंगामात नंतर, फुलगळ, फळ खरचटने आणि इजा होणे हे सर्व लक्षणात येतात. फळ खरचटने आणि फळांवर फोड्यांसारखे व्रण असतात ज्यामुळे ती विक्रीयोग्य रहात नाहीत. कमी फुलधारणा आणि फळांची प्रत यामुळे उत्पन्नात नुकसान अपेक्षित असते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

वार्‍याच्या नुकसानाविरुद्ध कोणतेही जैविक नियंत्रण उपाय नाहीत. प्रतिबंधक उपाय उदा. वार्‍याचे अडथळे, केल्याने नुकसान कमी करण्यात मदत मिळते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. नुकसानाचे प्रथम मूल्यांकन करुन पीक वाचविले जाऊ शकते का हे ठरविणे महत्वाचे आहे. झाडाच्या वाढीच्या टप्प्याप्रमाणेच संभावित उपचारही अवलंबुन असतील. गंभीर प्रकरणात, बुरशी आणि जिवाणूजन्य रोगांच्या प्रतिबंधाकडेच लक्ष पुरविले पाहिजे, उदा. झाडाचे प्रभावित भाग छाटून बुरशी आणि जिवाणू नाशक उत्पाद लावणे.

कशामुळे झाले

वार्‍याने लक्षणे उद्भवतात आणि सतत जोरदार वारा वाहणार्‍या ठिकाणी जिथे वार्‍याचे अडथळे नसतात तिथे हा खास चिंतेचा विषय असतो. मातीचे कण वार्‍याने उडुन किंवा फांद्यांच्या हालचालींमुळे नुकसान होऊ शकते. वार्‍याचा वेग, किती काळ वहातो आणि रोपाच्या वाढीचा टप्पा यावर लक्षणांची गंभीरता अवलंबुन असते. वालुकामय जमिनीत वाढविलेली काकडीची कोवळी रोपे वाळुच्या सपकार्‍यांना आणि जखमांना खासकरुन संवेदनशील असतात. फांद्यांच्या हालचालींमुळे पान आणि फळांच्या पृष्ठभागावर जखमा होतात. जिवाणू आणि बुरशी या नुकसानीत भागात घर करतात ज्यामुळे कूज होते. झाडाच्या वाढीचा टप्पा आणि जमिनीतील आर्द्रता तसेच हवामान याप्रमाणे सावरणे अवलंबुन असते.


प्रतिबंधक उपाय

  • वार्‍याचा ताण नाही अशा ठिकाणी पेरणी करा.
  • ओळींना आच्छादन करून कोवळ्या रोपांना आडोसा करा.
  • स्थायी स्वरुपाचे किंवा अधुनमधुन वार्‍याचे अडथळे वार्‍याची दिशा, वेग आणि पुनरावृत्तीची रचना ध्यानात घेऊन लावा.
  • शेताच्या सर्व बाजुने आपल्या पिकापेक्षा उंच किंवा दाट झाडी असणारी झाडे उदा.
  • मका किंवा राय लावा आणि तेच वैशिष्ट असलेली पिकांसोबत आंतरपीक घ्या.
  • खूपच जोराचा वारा वहात असेल किंवा दिशा बदलली तर एका पेक्षा जास्त एकेकटे वार्‍याचे अडथळे आपण निवडु शकता.
  • प्रभावित पान आणि फळे छाटणीचे उपकरण वापरून काढा.
  • जेव्हा योग्य असेल तेव्हा नविन वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी अतिरिक्त नत्राचा वापर करण्याचा विचार करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा