कापूस

कपाशीवरील लाल्या रोग

Leaf Reddening

इतर

थोडक्यात

  • प्रथमतः पानाच्या कडा लाल होतात.
  • कालांतराने संपूर्ण पान रंगहीन होते.
  • फांद्या लाल पडून मरगळतात.
  • पान आणि बॉडांची गळ होते.
  • वाढ खुंटते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

कापूस

लक्षणे

पानांचा लाल रंग, कारण आणि पिकाच्या टप्प्याप्रमाणे थोडा बदलतो. बहुतेक वेळा पानांच्या कडा पहिल्यांदा लाल होतात आणि रंगहीनता नंतर संपूर्ण पानभर पसरते. मर, फांद्या लाल होणे, बोंडे न धरणे किंवा चांगली विकसित न होणे, पाने आणि फुले अकाली गळणे आणि झाडाची वाढ खुंटणे ही इतर काही लक्षणे आहेत. पाने जुनी झाली कि रंगहीन होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे जिला पूर्ण शेतात पाहिले जाऊ शकते. त्याव्यतिरिक्त नत्र करमतरते व्यतिरिक्त लाल्या होण्यास जास्त थेट सुर्यप्रकाश मिळणे, कमी तापमान आणि वाऱ्यामुळे होणारे नुकसान देखील कारणीभूत असु शकते. अशा वेळी रंगहीनता पूर्ण शेतात न दिसता फक्त एकेकट्या पानांवर आढळते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

ताण आणि वाढीच्या टप्प्याप्रमाणे, सेंद्रिय खते देणे झाडास फायदेशीर असतात. जर हंगामात उशीरा पाने लाल होणे सुरु झाले किंवा भौतिक घटकांमुळे प्रक्रिया सुरु झाली तर जैविक नियंत्रणाची गरज नाही.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कपाशीवरील लाल्या रोगाविरुद्ध कोणतेही रसायनिक उपचार उपलब्ध नाहीत. भरपूर शेणखताचा पुरवठा, विवेकी सिंचन पद्धती आणि संतुलित खते दिल्यास ही समस्या टाळता येते. जर हे हंगामात लवकर होत असेल तर पोषकांच्या सुधारणेने समस्येचे निवारण केले जाऊ शकते. जर लक्षणे पहिले बोंड उघडण्याच्या सुमारास दिसु लागली तर कोणतेही उपाय करण्याची गरज नाही.

कशामुळे झाले

पाणी, तापमानाचा सतत ताण किंवा जमिनीची सुपीकता कमी असणे अशा बऱ्याच अजैविक घटकांमुळे लक्षणे दिसतात. काही सरळ किंवा संकरीत वाण इतरांपेक्षा जास्त संवेदनशील असतात. अँथोसायनिन नावाच्या लाल रंगद्रव्या वाढल्यामुळे आणि पानातील हरित द्रव्या क्लोरोफिलच्या कमतरतेमुळे देखील लाल छटा दिसते. एक कारण केशमुळे वाळून झाड सक्रियतेने पाणी आणि पोषकांचे शोषण चांगले करु शकत नाहीत हे सुद्धा आहे. पाने जुनी झाली कि रंगहीन होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्याचे उत्पादनावर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही. हंगामात जर ही लक्षणे लवकर दिसली तर नत्र, स्फुरद आणि पलाश (मॅग्नेशियमचा सहभाग नसतो) यांची कमतरता हे कारण असु शकते. याउलट, जास्त सूर्यप्रकाश, वारा आणि थंड तापमान देखील ही रंगहीनता सुरु करु शकते.


प्रतिबंधक उपाय

  • फळ धारणेच्या काळात जमिनीचे उच्च तापमान टाळण्यासाठी शिफारस केलेल्या वेळेत पेरणी करा.
  • लागवडीचे अंतर योग्य ठेवा.
  • अजैविक ताणास प्रतिकार करणारे कपाशीचे वाण लावा.
  • जमिनीला पुरेसे शेणखत देण्याची काळजी घ्या.
  • पिकाला थेट वार्‍याने नुकसान यासारखे भौतिक ताण येणार नाहीत याची काळजी घ्या.
  • झाडांच्या गरजेप्रमाणे विवेकाने सिंचन करा.
  • जमिनीतील पोषकांचे निरीक्षण करुन संतुलित पोषक व्यवस्थापन करा.
  • माती व्यवस्थित मिसळण्यासाठी काढणीनंतर खोल नांगरणी करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा