टोमॅटो

टोमॅटो फळावर चिरा पडणे

Fruit Deformation

इतर

थोडक्यात

  • फळावर खूप दाट चिरा पडतात आणि देठाच्या कडा राखाडीसर होऊ लागतात.
  • हे विकार मुख्यतः पाणी किंवा आर्द्रतेसंबंधी समस्यांमुळे होतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

टोमॅटो

लक्षणे

पुष्कळ, सूक्ष्म, केसांसारखे चिरा फळाच्या सालीवर उमटतात ज्या बहुधा केंद्रीकरणाच्या संरचनेप्रमाणे असतात. देठाचा भाग राखाडीसर होऊ लागते. चिरा फक्त काही मिलीमीटरच्या असतात आणि फळे पक्व होण्याच्या सुमारासच दिसु लागतात. ज्या फळांवर कीटनाशकाचा थेट अतिरेकी संपर्क आला आहे त्यावर याप्रकारचे व्रण येण्याचा संभव जास्त असतो. कीटकनाशकांमुळे करपण्याने सालीची लवचिकता कमी होते आणि फळ तडकण्यास अनुकूल असते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

या भौतिक विकाराविरुद्ध कोणतेही जैविक उपचार उपलब्ध नाहीत. हे केवळ प्रतिबंधात्मक उपाययोजनांद्वारेच टाळले जाऊ शकते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. हे केवळ प्रतिबंधात्मक उपाययोजनांद्वारेच टाळले जाऊ शकते, हे नुकसान अपरिवर्तनीय आहेत. तथापि, या विकाराची लक्षणे टाळण्यासाठी किटकनाशकांचा अतिरेकी वापर आणि जास्त कीटककनाशके मिसळणे टाळा.

कशामुळे झाले

या भौतिक विकाराची गल्लत, जरी चिरा सूक्ष्म, बारीक आणि वरवरच्याच असल्या तरी वाढीच्या तडकण्याबरोबर होऊ शकते. याचा संबंध बहुधा हरितगृहातील खूप आर्द्र हवामान आणि जमिनीतील आर्द्रतेत आणि दिवस/रात्रीच्या तापमानात सतत बदल होण्याशी असतो. पाण्याची अयोग्य पातळी (दुष्काळ, पाणी/पाऊस यातील अनियमितता, पाणी साचणे), पोषके जास्त किंवा कमतरता ही कारणे असु शकतात. शेवटी कीटकनाशकांचा चुकीचा किंवा अतिरेक वापराने परिस्थिती चिघळु शकते. फळे विशेषतः संवेदनशील असतात कारण ती वाढत्या शेंड्यामध्ये असतात आणि त्यांना नविन कोंबांबरोबर पाणी आणि पोषकांसाठी स्पर्धा करावी लागते.


प्रतिबंधक उपाय

  • कीटकनाशकांच्या उपचारांबाबत सावधगीरी बाळगा आणि अतिरेकी वापर तसेच विविध कीटकनाशकांचे मिश्रण टाळा.
  • फळांना सुरक्षित ठेवण्यापुरती झाडी रोपावर आहे याची खात्री करा.
  • जमीन थंड ठेवण्यासाठी व बाष्पीभवन कमी करण्यासाठी गरम हवामानात पुरेशा अच्छादनाचा वापर करा.
  • गादी वाफे तयार करुन पाण्याचा निचरा चांगला होऊ देण्याचा विचार करा.
  • सकाळी थोड उशीरा पाणी द्या आणि दिवसाच्या सर्वात उष्ण काळात पाणी देणे टाळा.
  • संपूर्ण झाडाला थंड ठेवण्यासाठी वरती सावली करा.
  • फळावर रंग दिसु लागला कि काढणी करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा