टोमॅटो

टोमॅटो पिकावरील वाढीचे तडकणे

Fruit Deformation

इतर

5 mins to read

थोडक्यात

  • फळाच्या सालीची लवचिकता जर वाढीच्या काळात जास्त ताणली गेली तर साल फुटते.
  • खोडावर देखील चिरा आणि तडकणे दिसु शकते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

टोमॅटो

लक्षणे

फळांच्या सालीला तडे जाणे आणि चिरा पडणे या स्वरुपात लक्षणे दिसतात. तडे आणि चीरांची खोली आणि आकार विविध असतो आणि बहुधा फळाच्या वरच्या भागात दिसतो. डागांची केंद्रीकृत किंवा त्रिज्यात्मक सममिती अनुसार विविध भौतिक विकार ठरविले जातात. काही वेळा फळाच्या बुडाकडील भाग देखील प्रभावित होतो. प्रभावित फळ जितके कोवळे असतात तितके ते तडे जाण्याच्या नुकसानीला बळी पडते. तडे आणि चिरा खोडावर देखील आढळतात. फळे सालीपेक्षा जास्त वाढल्यानेही हे विकार होते: सालीची लवचिकता जास्त ताणली जाते आणि चिरा उमटतात, ज्या अखेरीस तडकतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

या भौतिक विकाराविरुद्ध कोणतेही जैविक उपचार उपलब्ध नाहीत. हे केवळ प्रतिबंधात्मक उपाययोजनांद्वारेच टाळले जाऊ शकते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. हे केवळ प्रतिबंधात्मक उपाययोजनांद्वारेच टाळले जाऊ शकते. तथापि, नत्रयुक्त खतांचा अतिरेकी वापर टाळा आणि जमिनीतील पालाशच्या पातळीवर लक्ष द्या.

कशामुळे झाले

चिरा आणि तडे हे फळ अचानक आणि झपाट्याने वाढल्यामुळे होते व याचा संबंध बहुतेक करुन झाडाने जास्त पाणी शोषण्याशी आहे. झाडांच्या वाढीमध्ये थंड हवामान, ओला काळ, ज्यात उच्च आर्द्रता असते तिथुन ते एकदम गरम आणि कोरडे हवामान अशा पर्यावरण परिस्थितीतील बदलांमुळे अचानक बदल होऊ शकतो. समस्या टाळण्यासाठी संतुलित खत नियोजन अत्यंत महत्वाचे आहे. उदा. फुल आणि फळधारणेच्या काळात नत्रयुक्त खतांचा अतिरेकी वापर आणि पालाशयुक्त खते कमी वापर फळांच्या अतिरेकी वाढीस अनुकूल असतात ज्यामुळे चिरा आढळून येतात.


प्रतिबंधक उपाय

  • फळ तडकण्याला प्रतिकारक टोमॅटोचे वाण निवडा.
  • जास्त सिंचन करु नका आणि एकदम मोकळे पाणी भरण्यापेक्षा नियमित सतत पुरवठा देण्याकडे जास्त लक्ष द्या.
  • आगामी उच्च आर्द्रता, कमी सूर्यप्रकाश सारख्या हवामान घटनांचा मागोवा घेत रहा.
  • ताण टाळण्यासाठी प्रत्येक झाडावरील पान आणि फळांचे संतुलन योग्य राखा.
  • तसेच नत्रयुक्त खतांचा अतिरेक आणि पलाशयुक्त खतांचा कमी वापर टाळा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा