Physiological Disorder
इतर
कॅटफेस ही रोपाची शारीरिक समस्या आहे ज्यामुळे फळांची विकृती आणि बहुधा देठाच्या बाजुने खरचटणे दिसते. प्रभावित फळे बहुधा थोड्या लांबट आकाराची असतात आणि फिकट तपकिरी व्रण गरात खोलवर जातात. ह्याची गल्लत फळांच्या केंद्रीत किंवा वर्तुळाकार फुटण्याशी केली जाऊ नये. जरी ती विक्रीयोग्य रहात नसली तरी विकृत आकाराच्या फळांची चव चांगलीच असते आणि ती खाण्यासही सुरक्षित असतात. ह्याची संभावित कारणे फुलोर्याच्या वेळी रात्री १२ डिंग्री सेल्शियसच्या खालील तापमान, नत्राची उच्च पातली आणि वनस्पतीनाशकांमुळे झालेल्या जखमा असु शकतात. टोमॅटोची मोठी फळे असणारे वाणही संवेदनशील असतात.
ह्या रोगाचे उपचार फक्त प्रतिबंधक उपायांनीच केले जाऊ शकतात.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा.
टोमॅटोवर कॅटफेस येण्याची अचूक कारणे नक्की माहित नाहीत पण हे जास्त करुन मोठ्या फळांच्या वाणांवर येतात. कळ्या विकसित होताना रात्रीचे तापमान (१२ डिग्री सेल्शियस किंवा कमी) काही दिवस सातत्याने राहीले तर तो काळ आणि रोपांची शारीरिक व्याधी होणे हे संयोग आहेत, हे कादाचित फुलांचे परागीकरण अपूर्ण राहील्याने होत असावे. काही वान तापमान बदलास जास्त संवेदनशील असु शकतात. कळ्या विकसित होण्यात निर्माण होणार्या इतर बाधांचा परिणामही कॅटफेस असु शकतो. फुलांना शारीरिक नुकसान, जास्त छाटणी किंवा काही वनस्पतीनाशकांचा उपयोग (२,४डी) ह्यामुळेही विकृत आकाराची फळे निर्माण होतात. नत्राच्या असंतुलित पुरवठ्यामुळे होणारी फळाची जास्त वाढ हे ही कारण असु शकते. शेवटी फुलकिड्यांमुळे होणारे नुकसान किंवा निर्माण होणारी टोमॅटोची छोटी पाने अशी स्थिती ह्यामुळेही कॅटफेस दिसु शकते.