Herbicides Photosynthesis Inhibitors
इतर
वापरलेले उत्पाद, वेळ आणि प्रमाण यावर लक्षणे अवलंबुन असतील. नव्या पानांपेक्षा जुन्या पानांवर प्रभाव जास्त पडतो. पानांत शिरांमधील पिवळेपणा किंवा विखुरलेल्या पिवळ्या ठिपक्यांसह, शिरांमधील भाग पिवळा पडलेला असतो. पानांच्या कडा पिवळ्या पडून वरच्या दिशेने गोळा होतात. हळुहळु पाने वाळून कोरडी होतात आणि २-५ दिवसात गळतात. कडक उन्हात हे झपाट्याने (ती कागदाच्या पिशवीसारखी कोरडी आणि ठिसुळ होतात) होते. त्यांच्या झपाट्याने आणि नुकसानदायक प्रभावामुळे त्यांना बहुधा 'ब्लीचर्स' ही म्हणले जाते.
या नुकसानासाठी कोणतेही जैविक नियंत्रण उपाय उपलब्ध नाहीत. प्रतिबंध आणि शेतीच्या चांगल्या सवयी हे सर्वप्रथम नुकसान टाळण्याची पहिली पायरी आहे.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. तणनाशकांची फवारणी योजना करण्यापूर्वी कोणत्या प्रकारचे तण आहेत हे निश्र्चित करा, (मुख्यत्वे करुन रुंद पानांचे तण किंवा गवतवर्गीय) आणि जर हे कारणासाठी इतर काही चांगले उपचार उपलब्ध आहेत का ते ही पहा. तणनाशक काळजीपूर्वक निवडा आणि त्याच्या लेबलावरील सूचना आणि प्रमाणाचे पालन करा.
पीएसII अवरोधक गटाच्या अट्राझाइन, ब्रोमोक्झिनिल, डायुरॉन आणि फ्लुयोमेट्युरॉन सारख्या तणनाशकांमुळे नुकसान होते. ते प्रकाश संस्लेषण बंद करतात आणि पेशीतील हरित द्रव्ये नष्ट करतात, ज्यामुळे रंगहीनता होते. जमिनीत ऊगवणपूर्वीची (तण दिसण्यापूर्वी) तणनाशके म्हणुन वापरल्यास, ते मुळात शोषले जाते आणि तिथुन ते पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने वरती कोंबांपर्यंत पोचते. शेवटी ते पानांत खासकरुन कडांमध्ये जमा होते. ऊगवणीनंतरची तणनाशके झाडाच्या भागांना क्षेत्रीयपणे नुकसान करतात आणि झाडाच्या इतर भागात पोचत नाहीत. प्रतिकारतेच्या विकासाची समस्या अनेक प्रकारच्या तणात (उदा. गवतवर्गीय तण, राई, नेचे, आणि जंगली मुळ्यात) सर्वसामान्य अाहे.