लिंबूवर्गीय

फळ तडकणे

Physiological Disorder

इतर

थोडक्यात

  • गोठण्याने जखमा, साल ताणली जाणे, सालीवर दाणे येणे, पोकळ होणे आणि फळ तडकणे हे फळांच्या पृष्ठभागावर दिसुन येते.
  • फळ तडकणे हे तीन विविध प्रकारचे आहेत: गोलाकार, बारीक किंवा खोल चिरा पडणे.

मध्ये देखील मिळू शकते


लिंबूवर्गीय

लक्षणे

फांदीच्या गोलाकार भागापासुन फळांच्या मध्यापर्यंत गोलाकार चीर जाते. फळांना किरणोत्सर्गाचा त्रास होतो. फळांवर आढळणारी दाट वर्तुळे फळ तडकण्यास कारणीभूत ठरतात. फळ तडकणे ही टप्प्याटप्प्याणे होणारी प्रक्रिया असून ते फळ तडकण्याची सुरवात, मध्य आणि शेवटचा टप्पा असे तीन टप्प्यांमध्ये होते. फळ तडकण्याच्या सुरवातीच्या टप्प्यावर फळांच्या पृष्ठभागावर तपकिरी पट्टे येतात आणि पातळ साल फाटू लागते. मग तडा दिसु लागतो अणि तेल ग्रंथी विकृत होऊ लागतात. तैल ग्रंथी फाटल्यामुळे फळाच्या पृष्ठभागातील आणि आतील पेशींना नुकसान होते आणि पृष्ठभागावरील पेशी एकसंध रहात नाहीत.

शिफारशी

जैविक नियंत्रण

महत्वाच्या काळापूर्वी आणि काळात जास्त लक्ष घातल्यास भारी नुकसान कमी होते. झाडांना पुरेसे पाणी आणि पोषक तत्त्वे उपलब्ध करुन द्याव्यात. चिकणमाती आणि कंपोस्ट टाकून जमिनीचा पोत सुधारा. हळुवारपणे उपलब्ध होणारी खते आणि कंपोस्ट वापरुन झाडाला अचानक मिळणारी पोषके थांबवा. पालापाचोळा अंथरुन जमिनीतील आर्द्रता राखा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कॅल्शियम संयुगे किंवा जीए३ चे १२० पीपीएमची फवारणी कोवळ्या फळांवर केल्यास फळ तडकणे कमी होते. पालाशयुक्त खत, कॅल्शियमयुक्त खत आणि बोरॉनयुक्त खतांची फवारणी केल्यास फळांच्या सुरकुत्या चांगल्याच कमी होतात. फळ वाढीच्या सुरवातीलाच पालाश दिल्यास फळांची साल चांगली विकसित होते, जाडी वाढते आणि फळ तडकण्यास प्रतिकार क्षमता वाढते आणि तोडणीपूर्वी फळ तडकण्यास आळा बसतो.

कशामुळे झाले

तापमान, आर्द्रता यासारख्या विपरित हवामान परिस्थिती आणि हाताळण्याच्या सवयींमुळे तोडणीनंतर, तर बोरॉन, तांबे आणि मँगनीजसारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे तोडणीपूर्व हे विकार विकसित होऊ शकते. फळांच माप आणि आकार इंडेक्सचाही प्रभाव काही प्रमाणात फळ तडकण्यावर होतो. मोठी फळे जास्त तडकतात. लिंबूवर्गीय फळांची साल सुरकुतणे आणि फळ तडकणीवर मातृवृक्षमुळे होणारा प्रभाव अप्रत्यक्ष असतो. दररोज फळांच्या सुरकुत्या वाढण्यावर प्रकाशाच्या तीव्रतेतील दररोजचा बदलही नक्कीच संबंधित असतो. प्रकाशाच्या तीव्रतेमधील दैनंदिन फरक सकारात्मकपणे दररोजच्या फळांच्या सुरकुत्या वाढण्याचा दराशी संबंधित असतात. फळ पिकुन गळण्यापूर्वी जितकी सरासरी सापेक्ष आर्द्रता जास्त तितक्या फळांवर सुरकुत्याही जास्त येतात. पूर्ण सालीला पोषके अपूरी मिळाल्यास सालीत विकसन आणि चयापचय विकार उद्भवतात. म्हणुन बाहेरील वातावरणाच्या विपरित उत्तेजनाने फळ सुरकुतणे आणि तडकणे होते.


प्रतिबंधक उपाय

  • सिंचनाची वारंवारीता वाढवुन टोकाची आर्द्रता टाळा.
  • चांगल्या प्रतीची फळे आणि उत्पादन मिळविण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेची दृष्य लक्षणे दिसण्यापूर्वीच शोधावी लागते.

प्लँटिक्स डाऊनलोड करा