ढोबळी मिरची आणि मिरची

अजैविक उन्हाने करपणे

Abiotic Sunburn

इतर

थोडक्यात

  • पाने मरगळून पिवळी पडणे - कडांपासुन सुरवात होते.
  • पानगळ झाल्याने फळ किंवा झाडाच्या सालीवरही प्रभाव पडतो .

मध्ये देखील मिळू शकते

59 पिके
बदाम
सफरचंद
जर्दाळू
केळी
अधिक

ढोबळी मिरची आणि मिरची

लक्षणे

अजैविक उन्हाने करपणे यांचा संदर्भ थेट उन्हाने आणि जास्त तापमानाच्या मिश्रणाने रोपांना, झुडपांना किंवा झाडांना होणार्‍या नुकसानाशी आहे. या घटकांमुळे झाडाच्या भागातील आर्द्रता कमी होते ज्यामुळे सुरवातीला कोवळी, नविन पाने मरगळतात. ही पाने हळुहळु फिकट हिरवी आणि २-३ दिवसांनी त्यांच्या टोकांवर आणि कडांजवळ व्रण येतात. कालांतराने वाळणारे व्रण पानाच्या मध्याकडे पसरतात. दुष्काळाच्या ताणाने किंवा किड्यांच्या हल्ल्याने पानगळ झाल्यास देखील पानांची सावली मिळत नसल्याने फळे किंवा झाडाची साल उन्हाने करपते. झाडाच्या सालीवर भेगा आणि व्रण दिसतात जे अखेरीस वाढुन खोडात मृत भाग तयार करतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

पांढरी माती किंवा पावडरची धुरळणी केली असता पान आणि खोडावर थर साचून सुर्यप्रकाश अडविला जातो. यामुळे तापमान सुमारे ५-१० अंश सेल्शियस कमी होते. कॅल्शियम कार्बोनेट किंवा क्रिस्टलिन लाईमस्टोनवर आधारीत उत्पादांचीही शिफारस केली जाते. कार्नौबा मेणाचे उत्पादही नैसर्गिकपणे सुर्यप्रकाशातील घातक घटकांपासुन झाडाला सुरक्षित ठेवतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. अॅबसायसिक आम्ल जर पूरक खताच्या रुपात वापरले तर सफरचंदासारख्या फळांवरील उन्हाचे करपणे कमी करता येते आणि म्हणुनच इतर पिकात देखील ते चालण्यासारखे आहे. पॉलि-१-पी मिथेनसारखे अँटी ट्रांस्पिरंट उत्पाद जे पानातील पाण्याचे बाष्पीभवन कमी करतात, काही अभ्यासात याचे चांगले परिणाम दिसुन आले आहेत.

कशामुळे झाले

खूप जास्त ऊन, उच्च तापमान आणि कमी सापेक्ष आर्द्रता असलेल्या भागात वाढलेली रोपे किंवा झाडे यांमध्ये उन्हामुळे करपणे दिसणे खूप सामान्य आहे. उच्च स्थळांवरील अतिनील किरणे (यु.व्ही) उत्सर्जन जास्त असल्यामुळे समुद्रसपाटीपासुनची उंची हा महत्वाचा घटक आहे. लक्षणे पान, फळ आणि झाडाच्या सालीवर दिसतात. उन्हाने करपण्याच्या घटना आणि गंभीरताही झाडाचा वाण, वाढीचा टप्पा आणि जमिनीतील ओलावा यावर अवलंबुन आहे. परिपक्वतेच्या काळात जिथे तापमान आणि उन्हाचे तास जास्त आहेत तिथे उन्हाने करपणे खूप गंभीर असते. हवेतील एकामागुन एक बदल देखील फार महत्वाचे असतात: म्हणुन जर थंड किंवा सौम्य हवामान अचानक ऊष्ण, खूप ऊन असणारे झाले तरीही नुकसान होते.


प्रतिबंधक उपाय

  • उन्हाने करपण्याला जास्त सहनशील असलेले वाण लावा.
  • पिकाच्या गरजेप्रमाणे पाणी पुरवठा होतोय याची काळजी घ्या.
  • ताण आणि उन्हाने करपणे टाळण्यासाठी उष्णतेच्या लाटा येण्याअगोदरच सिंचन करा.
  • उन्हाळ्यात जास्त छाटणी करु नका आणि पाने काढु नका.
  • झाडीतुन हवा चांगली खेळती राहू द्या.
  • तुषार सिंचन वापरून तापमान कमी करण्याची पद्धत देखील अवलंब करू शकता.
  • गरज पडल्यास उन्हाचे चटके बसू नये म्हणून शेडनेट किंवा फळांवर आच्छादन देखील घातले जाऊ शकते.
  • जमिनीला पाणी राखून ठेवण्याची क्षमता वाढविण्यासाठी ओळींच्या मध्ये आच्छादन पिके (उदा.
  • अननसाच्या बागेत मका किंवा पांढरे वाटाणे) लावा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा