केळी

टनाशकांमुळे पाने जळणे (मरणे )

Phytotoxicity

इतर

थोडक्यात

  • पानांवर करपट डाग, धब्बे येतात.
  • पाने पिवळी आणि मरगळलेली असतात.
  • करपणे किंवा शेंडे मर होते.

मध्ये देखील मिळू शकते

35 पिके
केळी
जव
द्वीदल धान्य
कारले
अधिक

केळी

लक्षणे

रसायनांच्या गैरवापराने किंवा चुकीच्या प्रमाणात वापरल्याने दिसणाऱ्या लक्षणांना फायटोटॉक्झिसिटी असेही म्हटले जाते. पानावरील डाग, करपट धब्बे, कडा करपणे आणि शेंडे मर या लक्षणात येतात आणि कधीकधी रोग, कीटक किंवा कोळ्यांमुळे नुकसान किंवा पर्यावरणविषयक शर्तीमुळे झालेल्या इतर रोगांशी गोंधळ होऊ शकतो. वार्‍याच्या झोक्याने लक्ष्य नसलेल्या किंवा संवेदनशील झाडांनाही नुकसान होऊ शकते. विसंगत रसायनांच्या एकाच वेळी केलेल्या वापरानेही फायटोटॉक्झिसिटी होऊ शकते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

जेव्हा कीड किंवा रोग भाजीपाल्याच्या झाडांना गंभीर नुकसान करतात, तेव्हा काही वेळेस संक्रमित भाग खुडुन टाकणे किंवा परत रोप लावणे चांगले असते आणि पुढच्या वेळी समस्या कशी टाळायची हे जाणून घेणे चांगले.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कीटनाशकांमुळे करपणे नियंत्रित करण्यासाठी कोणतेही रसायनिक उपचार उपलब्ध नाहीत. कीटनाशकांचा उपयोग दिलेल्या सूचनांप्रमाणेच करा. गंभीर इजा झाल्यास युरिया १० ग्रॅ/ली पाणी किंवा पॉलिफीड १० ग्रॅ/ली पाणी फवारा.

कशामुळे झाले

शक्यतो प्रतिकूल हवामानात कीटकनाशकांची फवारणी केल्याने फायटोटॉक्झिसिटी उद्भवते. सामान्यतः उच्च तापमान आणि आर्द्रतेमुळे कीटकनाशकांपासून (कीटनाशके, बुरशीनाशके खास करुन साबण, तेले आणि गंधकचे मिश्रण) इजा होण्याची शक्यता वाढते. या उलट थंड ओलसर हवेत कॉपर बुरशीनाशकांमुळे झाडांना होऊ शकणाऱ्या इजेची शक्यता वाढते. फवारणी शक्यतो शांत, कोरड्या आणि थंड हवामानात केली गेली पाहिजे. बहुतेक कीटनाशके तापमान २५ डिग्री सेल्शियसच्यापेक्षा कमी असताना वापरल्यास चांगला परिणाम देतात. जैविक ताणांचे वातावरण (दुष्काळ, किड्यांमुळे झालेली इजा) यामुळे झाडांना रसायनिक नुकसानासाठी अनुकूल करतात. गरम, दमट आणि ढगाळ हवामान ज्यामुळे हवा कोरडी रहात नाही त्यात प्रतिकारक झाडही संवेदनशील होतात.


प्रतिबंधक उपाय

  • कीटकनाशकांचा वापर आवश्यक असल्यास, माहितीपत्रकामध्ये दिलेल्या निर्देशांनुसार वापर करणे सुनिश्चित करा.
  • वनस्पतींची संवेदनशीलता आणि कीटकनाशकांच्या मिश्रणांच्या संदर्भात नेहमी सावधगिरी बाळगा.
  • जेव्हा किडे किंवा रोग भाजीपाल्याच्या झाडांना गंभीर नुकसान करतात, तेव्हा कीटकनाशके वापरण्यापेक्षा त्यांचे संक्रमित भाग काढुन टाकणेच चांगले असते.

प्लँटिक्स डाऊनलोड करा