Adventitious roots
इतर
गाठी, छोटे फोड, सूज किंवा बारीक केस झाडाच्या खोडावर येतात. खोडावर ते कोणत्याही भागात दिसु शकतात.
ही समस्या निरुपद्रवी असल्याने ह्यासाठी कोणतेही जैविक नियंत्रण आवश्यक नाही; फक्त हे टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाय करावेत.
ही समस्या निरुपद्रवी असल्याने ह्यासाठी कोणतेही रसायनिक नियंत्रण आवश्यक नाही; फक्त हे टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाय करावेत.
ह्या गाठी निरुपद्रवी असतात, तरीही ही लक्षण दर्शवितात कि टोमॅटोच्या झाडावर ताण आहे. हा ताण मूळ प्रणालीस नुकसान झाल्याने, अनुचित प्रमाणात पाणी दिल्याने, जास्त आर्द्रता किंवा बुरशीचे संक्रमण झाल्याने येऊ शकतो. ह्या ताणांना सामोरे जाण्यासाठी अशी मुळे येणे ही झाडाची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. हे ही लक्षात ठेवले पाहिजे कि टोमॅटोची काही वाण जर काही ठराविक उत्पादन परिस्थितीत (जास्त आर्द्रता, पाण्याची कमतरता) ठेवल्यास ती झाडे भौक्तिक प्रतिक्रिया म्हणुन अशी उरपाटी मूळ विकसित करतात. पारंपारिक वाण ही अशा उरपाट्या मुळांच्या विकसनास धार्जिणी असतात.