टोमॅटो

ग्लायफोसेटने ईजा होणे

Herbicide Shikimic acid pathway inhibitors

इतर

थोडक्यात

  • पानांची वाढ खुंटते व कालांतराने पिवळसर होतात अखेरीस जळतात.

मध्ये देखील मिळू शकते


टोमॅटो

लक्षणे

सुरवातीच्या लक्षणात, कोवळ्या पानांच्या देठापाशी पांढरट/ पिवळसर रंगहीनता दिसते. कोवळ्या पानांचे देठ छोटे आणि सुरकुतलेले असुन कडा तपकिरी असतात आणि ते वर कपासारखे वळतात. फुलधारणा कमी झाल्याने उत्पन्नाचे नुकसान होते. फळे विकृत आणि छोटी असतात तसेच त्यावर तपकिरी व्रण येतात. गंभीर बाबतीत, वाळणे हे झाडाच्या शेंड्यापासुन सुरु होते आणि खाली पसरते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

काहीही नाही.

रासायनिक नियंत्रण

काहीही नाही.

कशामुळे झाले

अनिवडक तणनाशक ग्लायफोसेटच्या अनुचित वापराने नुकसान होते. शेतकर्‍याने फवारणी करताना किंवा बाजुच्या शेतातुन हवेच्या झोताबरोबर उडुन आल्याने किंवा एकच फवारा उपकरण कीटनाशकांसाठी तसेच तणनाशकांसाठी वापरल्यास फवाऱ्यामध्ये राहिलेल्या अंशाने लक्ष्य नसलेल्या झाडांच्या प्रजातीवर परिणाम होऊ शकतो. तणनाशक हे पानांवर वापरले जाते आणि तिथुन ते तणात पूर्णपणे पसरते आणि झाडाच्या फुटव्यांसाठी आवश्यक असणार्‍या अमिनो आम्लांच्या उत्पादनासाठी लागणार्‍या रसायनांत बाधा आणुन तणाला मारते. हवेचा झोत, फवाऱणी उपकरणांमध्ये राहीलेले अंश, मातीतुन राहीलेले अंश, उडणारे तुषार किंवा वाफ, चुकुन फवारणी होणे वगैरेसारख्या कारणांनीही लक्ष्य नसलेल्या झाडांवर तणनाशक परिणाम करु शकते. किती औषध उडाले, वाढीची परिस्थिती, प्रभावित वाण आणि वाढीचा टप्पा यासारख्या घटकांवर नुकसानाची तीव्रता अवलंबुन असते. नुकसान खूप जास्त होऊ शकते आणि बहुधा परिणामी मूल्यवान झाडे कायमची मरुही शकतात.


प्रतिबंधक उपाय

  • चांगले स्वास्थ्य राखण्यासाठी पाणी आणि खते द्या.
  • सर्व रसायनांच्या लेबलांवरील सूचना वाचुन पाळा.
  • ह्या व्यतिरिक्त शिफारशीत खतेही उचित प्रमाणात द्या.
  • फवाऱ्याचे व्यवस्थित नियोजन करुन तणनाशकाची फवारणी करा.
  • थंड व ओल्या हवामानात फवारणी करणे टाळा कारण तण नाशकांची चयापचय प्रक्रिया अशा काळात खूप हळू होते.
  • हवेचा वेग व झोताची दिशाही किमान असेल तेव्हाच तणनाशके वापरा.
  • तणनाशकांचे फवारा उपकरण, कीटनाशक किंवा बुरशीनाशकांच्या फवारणीसाठी वापरु नका.
  • ईजेची लक्षणे दिसु लागल्यानंतर ती सुधारण्यास बहुधा फार उशीर झालेला असतो.
  • तरीही, जर लक्षणे गंभीर नसतील आणि झाड मेले नसेल तर नविन फुटवे येणे सामान्य आहे.

प्लँटिक्स डाऊनलोड करा