कोबी

पानाचे विविधरंगी रूपांतर

Chimera

इतर

थोडक्यात

  • पानावरील वैरिगेशन येण्याचे वैशिष्ट्य म्हणजे पानावर विविध रंगाची छटा असलेल्या ठिगळांची रंगहीनता होय.
  • पानांचे काही भाग पांढरे ते पिवळे पडतात ज्यामुळे ठिगळ, धब्बे किंवा आडव्या पट्ट्यांची नक्षी तयार होते.
  • ही परिस्थिती निरुपद्रवी असते आणि फक्त काही रोपांनाच प्रभावित करते.

मध्ये देखील मिळू शकते


कोबी

लक्षणे

पानावरील वैरिगेशन होण्यात पानांची आणि काही वेळा फांद्यांचीही काही भागात पांढरी ते पिवळी अनियमित पसरलेली रंगहीनता दिसते. सामान्य हिरव्या रंगाचे भाग शेजारीच असल्यामुळे स्पष्ट ठिगळ, धब्बेदार किंवा आडव्या पट्ट्यांची नक्षी दिसते. काहीवेळा शिरावर देखील विविध रंगाच्या छटा दिसतात तर उरलेला पानाचा भाग गडद हिरवाच रहातो. जर झाडाचा मोठा भाग प्रभावित झाला तर हरित द्रव्य कमी पडल्याने वाढ खुंटते. तथापि, बहुतेक बाबतीत कमतरता फक्त शेताच्या छोट्या टक्केवारीलाच प्रभावित करते आणि उत्पादनावर परिणाम होत नाही.

शिफारशी

जैविक नियंत्रण

या विकृतीसाठी कोणतीही थेट नैसर्गिक कारणे नाहीत, कोणतेही जैविक उपचार याच्या उपायासाठी उपलब्ध नाहीत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. पानावरील वैरिगेशन होणे ही जुनकीय किंवा भौतिक विकृती आहे आणि अशा विकृती सुधारणेसाठी कोणतेही रसायनिक उत्पाद उपलब्ध नाहीत.

कशामुळे झाले

पानावरील वैरिगेशन होणे ही जनुकिय किंवा भौतिक विकृती आहे जी पर्यावरण परिस्थितीशी निगडित नाही, म्हणजे त्यात कोणत्याही जंतुचा हात नाही. पानावरील वैरिगेशन होण्याचे मुख्य कारण हे पानांच्या भागात हरित द्रव्यांची कमतरता असते. ही नैसर्गिकरीत्या छोट्या प्रमाणावर होते आणि यामुळे झाडाला किंवा उत्पादनाला मोठा धोका होत नाही. तथापि, काही शोभेची आणि बगीच्यातील झाडे नैसर्गिकरीत्या विविध रंगाच्या छटेची असतात आणि हा त्यांच्या सौंदर्याचा भाग असतो.


प्रतिबंधक उपाय

  • माहितीतल्या सरळ/संकरीत वाणांची प्रमाणित बियाणे घ्यावी.
  • बियाणे जनुके विकृतपणापासुन मुक्त आहेत याची खात्री करावी ज्यामुळे पानावरील वैरिगेशन होण्यास प्रतिबंध करण्यात मदत होईल.

प्लँटिक्स डाऊनलोड करा