टोमॅटो

टोमॅटोची पाने मुडपणे

Physiological Disorder

इतर

थोडक्यात

  • पाने विकृत आणि रंगहीन.
  • झाडी ठिसुळ.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

टोमॅटो

लक्षणे

नावाप्रमाणेच पाने विकृत होण्याची लक्षणे दिसतात. सुरवातीला मुडपणे फक्त खालच्या पानातच दिसते आणि पाने वरच्या आणि आतल्या बाजुला लांबीने मुडपतात. बहुधा जर हवामान परिस्थिती आणि पारंपारिक घटक सुधारुन ताण कमी केला तर रोपे सावरतात. पाने खालच्या बाजुने फिकट, खुंटलेली, पिवळ्या कडांची किंवा जांभळट शिरांची दिसतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

या भौतिक विकाराविरुद्ध कोणतेही जैविक उपचार माहितीत नाहीत. याचा फक्त प्रतिबंध केला जाऊ शकतो.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. या भौतिक विकाराला फक्त प्रतिबंधक उपायांचेच उपचारा आहेत.

कशामुळे झाले

पाने मुडपण्याचा हा भौतिक विकार हवामानाच्या ताणाने होतो. जास्त आर्द्रता आणि नत्राची पातळी जास्त असणे ही पाने विकृत होण्याची मुख्य कारणे आहेत, ह्याबरोबरच उष्णता, कोरडे हवामान, झाडीची जास्त छाटणी, मुळांना नुकसान आणि पुनर्लागवडीचा धक्का ही ही कारणे आहेत. पाने मुडपण्याची लक्षणे विषाणूंच्या संक्रमणाच्या लक्षणांसारखीच असतात त्यामुळे गल्लत होऊ शकते. उदा. पांढरी माशीद्वारे वहन केलेले विषाणू (बोकड्या - वायएलसीव्ही) ज्यामुळे नवीन पानांच्या वाट्या होतात.


प्रतिबंधक उपाय

  • टोमॅटोचे बुटके वाण चांगला निचरा असलेल्या जमिनीत लावा.
  • जमिनीची आर्द्रता समान आणि पुरेशी राखा.
  • खतांचा खासकरुन नत्राचा जास्त वापर टाळा.
  • उचित पलाश द्या.
  • झाडीची जास्त छाटणी करणे टाळा.
  • तापमान ३५ अंशाखाली राखण्यासाठी बाष्पीभवनाने थंड करण्याची पद्धत वापरा किंवा सावली द्या.

प्लँटिक्स डाऊनलोड करा