टोमॅटो

फळावर कोरडे ओरखडे पडणे

Physiological Disorder

इतर

5 mins to read

थोडक्यात

  • फळांना करपट चट्टे (ओरखडे) लांब किंवा आडव्या रीतीने वेढतात.
  • हा भौतिक विकार फळधारणेच्या काळात कमी तापमान आणि उच्च आर्द्रतेमुळे होतो.
  • हा सक्रीयपणे टाळता येऊ शकतो पण एकदा झाल्यास यावर उपचार नाहीत.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

टोमॅटो

लक्षणे

फळांवर कोरडे ओरखडे पडणे हा भौतिक विकार आहे ज्याच्या परिणामी करपट ओरखडे फळाला वेढतात ज्यामुळे फळे तडकतात. हे ओरखडे (व्रण) अंशतः फळांच्या लांबी किंवा रुंदीत वेढतात, क्वचित देठाकडून बुडापर्यंत ओरखडा पडून कपड्याच्या झिप सारखे दिसतात म्हणुन हे सामान्य नाव पडलेले आहे. फळाच्या गरापर्यंत चिरा पडतात आणि पृष्ठभाग बेढब होणे सामान्य आहे. प्रभावित भागाची लवचिकता जाते आणे फळे नीट विकसित होत नाहीत. एकदा का नुकसान दिसु लागले कि काहीही करण्यास उशीर झालेला असतो.

Recommendations

जैविक नियंत्रण

या भौतिक विकाराविरुद्ध कोणतेही जैविक उपचार उपलब्ध नाहीत. हे केवळ प्रतिबंधात्मक उपाययोजनांद्वारेच टाळले जाऊ शकते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. हे केवळ प्रतिबंधात्मक उपाययोजनांद्वारेच टाळले जाऊ शकते.

कशामुळे झाले

फुलधारणेच्या शेवटी आणि फळ धारणेच्या सुरुवातीला कमी तापमान आणि उच्च आर्द्रता असल्यास हा भौतिक विकार आढळून येतो. कोवळ्या फळाच्या विकासादरम्यान, एक किंवा अनेक परागकोष अंडाशयच्या भिंतीशी संलग्न राहतात, ज्यामुळे फळ विकसित होताना बारीक व्रण बाहेरच्या बाजुला दिसतात. तापमानाची संवेदनशीलता वाणावाणात वेगवेगळी असते. काही टोमॅटोचे प्रकार इतर प्रकारांपेक्षा जास्त प्रवण असतात, त्यातही बीफस्टिक टोमॅटो सर्वात जास्त पीडित असतात.


प्रतिबंधक उपाय

  • थंडी प्रतिकारक आणि सहनशील वाण लावा.
  • फुल आणि फळ धारणेसाठी पर्यावरणाची परिस्थिती अनुकूल करा.
  • रात्रीचे फार कमी तापमान, अपुरा सूर्यप्रकाश आणि टोकाची आर्द्रता टाळा.
  • झाडाची ऊर्जा वाया जाऊ नये म्हणुन रेषा पडलेली फळे लवकर काढा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा