लिंबूवर्गीय

लिंबुवर्गीय हिंदू कोळी

Schizotetranychus hindustanicus

कोळी

थोडक्यात

  • पानांवर पुष्कळसे सूक्ष्म राखाडी किंवा रुपेरी ठिपके येतात.
  • हल्ला केलेला भाग दूरवरुन बहुधा रुपेरी दिसतो.
  • जास्त संक्रमण झाल्यास अकाली पानगळ, काटक्यांची मर, कमी फळधारणा, आणि झाडाचा जोम कमी होतो.
  • चांगल्या पाणी पुरवठ्याने घटना आणि ह्या किड्यांनी केलेले नुकसान कमी होते.

मध्ये देखील मिळू शकते


लिंबूवर्गीय

लक्षणे

नुकसानांचे वैशिष्ट्ये पानांच्या वरच्या पृष्ठभागावर सूक्ष्म राखाडी किंवा रुपेरी ठिपक्यांनी दिसतात ज्याला स्टिपलिंग असेही म्हणतात. हे मध्यशीरेच्या बाजुने जास्त दाट असतात आणि नंतर पूर्ण पानावर पसरतात. झाडाच्या परिघातील पाने, फळे आणि काटक्यांवर बहुधा हल्ला होतो. संक्रमणाच्या जास्त पातळीवर, हे ठिपके मोठे होऊन एकमेकात मिसळतात ज्याने पाने किंवा फळे समान रुपेरी किंवा तांबट दिसतात. हल्ला केलेले भाग हळुहळु टणक होऊन कुजतात आणि झाडाचा जोम कमी होतो. हे खासकरुन प्रतिकूल परिस्थितीत होते, उदा. कोरड्या, वारा वाहत्या हवेत. ह्या उलट, चांगला पाणी पुरवठा उपद्रवाच्या घटना आणि त्यांनी केलेले नुकसान कमी करतो.

शिफारशी

जैविक नियंत्रण

सिझोटेट्रानिचस हिंदुस्तानीकसचे भक्षक आणि नैसर्गिक शत्रु भरपूर आहेत, कोळ्यांना प्रतिकूल हवामान परिस्थिती असल्यास नियंत्रण करण्यास बहुधा पुरे होतात. जाळ्यांच्या घरट्यांमुळे फितोसेलिड कोळी (उदा. युसियस स्टिप्युलेटस) ह्या कोळ्यांविरुद्ध जास्त प्रभावी होत नाहीत. लेडीबर्डसच्या स्टेथोरस प्रजातीच्या काही जाती ह्या उपद्रवास आधाशासारख्या खातात. बुरशी आणि खास विषाणूही शेतात ह्यांची लोकसंख्या नियंत्रणात मोठी भूमिका बजावतात, ह्यावर तापमानाचा मोठाच हात असतो.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. निवडक कीटनाशकांची फार शिफारस करण्यात येते कारण विस्तृत श्रेणीच्या कीटनाशकांमुळे शिकारी आणि इतर मित्र किड्यांनाही नुकसान होऊन परिस्थिती आणखीन चिघळु शकते. विविध प्रकारचे अॅकारीसाइडसना आलटुन पालटुन वापरल्याने प्रतिकार विकसित होत नाही.

कशामुळे झाले

सिझोटेट्रानिचस हिंदुस्तानीकस या लिंबुवर्गीय हिंदू कोळ्यांच्या खाण्यामुळे लक्षणे उद्भवतात. ह्यांचे वैशिष्ट्य आहे पानांच्या खाली माद्यांनी तयार केलेले खास कोळ्याचे जाळे (१-३ मि.मी. व्यासाचे) ज्यात वसाहती तयार होतात. हे वैशिष्ट्य त्यांना इतर कोळ्यांपासुन वेगळे पाडते आणि 'जाळ्याचे घरटे बनविणारे कोळी' यासारखे सामान्य नाव मिळते. प्रौढ घरट्यातुन बाहेर पडुन इतर पाने किंवा फळांच्या भागांवर हल्ले करतात, तर अप्रौढ टप्प्यातील कोळी जाळ्याखाली रहातात. किडे आणि पक्षीही कोळ्यांचे वहन आणि प्रसार इतर झाडांवर करतात. संक्रमित हत्यारे आणि शेतीच्या वाईट सवयींमुळेही उपद्रवाचा प्रसार इतर शेतात होतो. चांगल्या सिंचन योजनेसोबत झाडांना भरपूर पाणी पुरवठा केल्यास उपद्रवाच्या घटना आणि त्यामुळे होणारे नुकसान चांगलेच कमी होते. ह्या विरुद्ध, कमी किंवा जास्त आर्द्रता, जास्त वारा, दुष्काळ किंवा चांगली विकसित न झालेली मूळ प्रणाली परिस्थितीला आणखीन खराब करते.


प्रतिबंधक उपाय

  • कोळ्यांची संख्या जाणुन घेण्यासाठी बागेचे भिंगाच्या सहाय्याने नियमित निरीक्षण करा.
  • मित्र किडींच्या लोकसंख्यावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणुन कीटनाशकांचा जास्त वापर टाळा.
  • झाडाला योग्य पाणी पुरवठा करा आणि दुष्काळाचा ताण टाळा.
  • फांद्या जमिनीवरील गवत किंवा तणांच्या संपर्कात येऊ देऊ नका.
  • बागेतुन तण काढा.
  • काढणीनंतर गळलेल्या फांद्या आणि कचरा काढा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा