ऑलिव्ह

ऑलिव्हवरील अँथ्रॅकनोज

Glomerella cingulata

बुरशी

थोडक्यात

  • गोलाकार दबलेल्या व्रणांच्या सभोवताली केंद्रीत वर्तुळे येतात.
  • तपकिरी फळे कूजतात आणि नारंगी चिकट मूसाने भरतात.
  • फळे आकसतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
ऑलिव्ह

ऑलिव्ह

लक्षणे

केंद्रीत वर्तुळांसह गोलाकार दबलेल्या व्रणांतुन पहिली लक्षणे दिसतात. आर्द्र परिस्थितीत, मऊ ते गडद तपकिरी फळे कूजतात. कोरड्या हवामानात फळे शुष्क होऊन आकसतात. दोन्ही बाबतीत फळे अकालीच गळतात. जेव्हा फळे पक्व होतात तेव्हाच ही लक्षणे बहुधा दृष्य होतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

फुलधारणेपूर्वी आणि फळे पक्व होण्याच्या वेळेस वापरल्यास ऑरियोबॅसिडियम पुलुलान्सचे काही एंडोफिटीक स्ट्रेन्सनी कोलेटोट्रिकम प्रजातीविरुद्ध उच्च संरक्षण पातळी दर्शविली आहे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. स्ट्रोबिल्युरिन्स, मँकोझेब किंवा कॉपरवर आधारीत बुरशीनाशकांची , फुलधारणेपूर्वी एकदा आणि फळधारणेच्या सुरवातीला एकदा अशी एकदा किंवा दोनदा फवारणी करा. जर पहिल्या फवारणीनंतरही संक्रमण शिल्लक राहीले असेल तर दुसर्‍या फवारणीची आवश्यकता भासु शकते. छाटणीनंतर फवारणी करा म्हणजे छाटलेल्या भागात आणि झाडांवर शिल्लक राहीलेल्या भागात पुन: संक्रमणाचा प्रतिबंध होईल.

कशामुळे झाले

ग्लोमेरेला सिनगुलाटा नावाची बुरशी झाडांच्या भागात सूप्तावस्थेत असु शकते आणि खूप जास्त आर्द्र किंवा कोरड्या हवामान परिस्थितीत सक्रिय होऊ शकते. ऊबदार आणि आर्द्र वातावरण परिस्थिती ग्लोमेरेला सिनगुलाटाच्या विकसनास अनुकूल असते, खासकरुन फुलधारणा आणि तोड्यापूर्वी. जंतु झाडावरच चिकटुन राहीलेल्या पण आकसलेल्या फळांत आणि पानांत तसेच लाकडी भागात जगते.


प्रतिबंधक उपाय

  • सहनशील किंवा प्रतिकारक वाण लावा.
  • नविन ऑलिव्हच्या बागांमध्ये निरोगी लागवड सामग्रीच वापरा.
  • झाडीतुन हवा आणि प्रकाश चांगला राहील याची खात्री करा.
  • कमी नत्र सामग्री असणारी खते पुरेशी द्या.
  • आपल्या झाडांना जास्त पाणी देणे टाळा.
  • निरीक्षण करुन संक्रमण लवकर ओळखा.
  • छाटणीची उपकरणे स्वच्छ आणि निर्जंतुक करुन ठेवा.
  • अधिक प्रसाराचा प्रतिबंध करण्यासाठी प्रभावित झाडांची छाटणी करा.
  • संक्रमित फळे आणि छाटणी केलेले अवशेष काढुन नष्ट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा