पिस्ता

पिस्ता उन्हाने करपणे

Abiotic Sunburn

इतर

थोडक्यात

  • पाने मरगळतात आणि पिवळसर होतात - जे कडांपासुन सुरु होते.
  • फळे आणि झाडाची सालही पानगळीनंतर प्रभावीत होते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
पिस्ता

पिस्ता

लक्षणे

अजैविक उन्हाने करपणे हे थेट ऊन आणि खूप जास्त तापमान ह्यांच्या संयोगाने झाडास होणार्‍या नुकसानास संदर्भित करते. हे घटक झाडाच्या भागातील आर्द्रतेत बदल करतात ज्यामुळे सुरवातील कोवळी, नवी पाने मरगळतात. ही पाने हळु-हळु फिकट हिरवी होतात आणि २-३ दिवसांनंतर त्यांच्या टोक आणि कडांजवळ व्रण विकसित होतात. वाळलेले डाग नंतर पानाच्या मध्यापर्यंत वाढत जातात. दुष्काळाचा ताण किंवा किडींच्या हल्ल्याने झालेल्या पानगळीमुळेही साली उन्हाने करपतात. तीथे त्या साली फाटतात आणि व्रण येतात, जे नंतर अखेरीस खोडावरील वाळलेल्या भागात बदलतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

उन्हात अडथळा आणण्यासाठी पांढरी क्ले किंवा टाल्कचे द्रावणही पानांवर आणि खोडावर फवारले जाऊ शकते. ह्यामुळे तापमान ५-१० अंशानी कमी होऊ शकते. कॅल्शियम कार्बोनेट किंवा क्रिस्टलाइन लाईमस्टोनवर आधारीत उत्पादांची शिफारसही केली जाते. कार्नौबा वॅक्स उत्पादने ही झाडांवरील उन्हास संरक्षण देणारे म्हणुन काम करतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. अॅब्सिसिक आम्ल जर खतांना पूरक म्हणुन वापरले तर सफरचंदांना फळांना उन्हाने करपण्याचे नुकसान कमी होते म्हणुन कदाचित इतर पिकांवरही हे काम करेल. काही अभ्यासांमध्ये बाष्पीभवन विरोधी उत्पाद जे पानांतील पाण्याचा र्‍हास कमी करतात जसे कि पॉली-१-पी मेंथिन, च्या वापरानेही चांगले निकाल दर्शविले आहेत.

कशामुळे झाले

जास्त सौर विकरण, जास्त तापमान आणि कमी सापेक्ष आर्द्रता असणार्‍या भागात उन्हाने करपण्याची ईजा सर्वसामान्यपणे दिसते. समुद्रसपाटीपासुनची उंचीही ह्यात भूमिका निभावते कारण समुद्रसपाटीपासुन जास्त उंचीवर अतिनील विकरणही जास्त असते. पानांवर, फळांवर आणि सालीवर लक्षणे दिसतात. उन्हाने करपण्याच्या घटना आणि तीव्रता ही झाडाचे वाण, त्याच्या वाढीचा टप्पा आणि जमिनीतील आर्द्रता, या घटकांवरही अवलंबुन असते. जेव्हा फळे विकसित होताना हवेचे तापमान आणि दिवसाचे तास जास्त असतात तेव्हा उन्हाने करपणे गंभीर रुप धारण करते. हवामानातील टोकाचा फरकही महत्वाचा आहे, जेव्हा थंड किंवा सौम्य हवामानांतर अचानक उष्ण उन्हाळी हवामान आले तरी नुकसान होऊ शकते.


प्रतिबंधक उपाय

  • उन्हाने करपण्यास सहनशील वाण लावा.
  • जमिनीची पाणी राखण्याची क्षमता वाढविण्यासाठी ओळींच्या मध्ये आच्छादन पिके (उदा.
  • मका किंवा तूर यांची लागवड अननसाच्या बागेत करणे) लावा.
  • पिकाच्या पाण्याच्या आवश्यकतेप्रमाणेच सिंचन केले जात आहे ह्याची खात्री करा.
  • झाडांना ताण आणि करपणे होणे टाळण्यासाठी उष्म्याची लाट येण्याच्या थोडे पूर्वी किंवा त्या काळात सिंचन करा.
  • उन्हाळ्यात जास्त छाटणी करु नका किंवा पाने काढु नका.
  • झाडीतुन हवा चांगली खेळू द्या.
  • रोप किंवा झाडासाठीची फवारणी करुन थंड करणारी प्रणालीही वापरली जाऊ शकते.
  • आवश्यकता भासल्यास शेडनेट देखील वापरले जाऊ शकते.

प्लँटिक्स डाऊनलोड करा