Alkalinity
इतर
पीकाच्या वाढीच्या कोणत्याही टप्प्यावर क्षारामुळे नुकसान होऊ शकते. पानांवर पांढरी ते लालसर तपकिरी रंगहीनता दिसुन येते जी बहुधा पानाच्या टोकापासुन सुर होते. भरपूर क्षार असण्याच्या परिस्थितीत, रंगहीनता पूर्ण पानाच्या पात्यावर पसरते आणि पाने वाळतात, ज्यामुळे झाडे करपल्यासारखी दिसु लागतात. पाने गोळा होण्याची विकृतीही दिसु शकते. उच्च अल्कधर्मी जमिनीत झाडाची वाढ आणि कांडे येण्यांवर मर्यादा येतात, परिणामी वाढ खुंटते. जी झाडे फुलोरा येण्यापर्यंत तग धरतात, त्यांच्या फुलधारणेत उशीर होऊन दाणे न भरता फक्त पांढर्या ओंब्या दिसतात. क्षारतेच्या लक्षणांचा नत्र कमतरतेच्या लक्षणांशी गोंधळ होऊ शकते.
क्षार जमिनीतील बदल सेंद्रिय कंपोस्ट, कचर्यात टाकलेले केस किंवा पीस, सेंद्रिय कचरा, वाया गेलेले कागद, फेकण्यात आलेली लिंबे किंवा संत्री जमिनीत घालुनही केला जाऊ शकतो. यामुळे आम्लयुक्त सामग्री (सेंद्रिय किंवा निरिंद्रिय बाबी) जमिनीत जाण्याची खात्री केली जाते. जमिनीत आम्ल घालण्यासाठी खनिजे जसे कि पायराइट किंवा स्वस्त अल्युमिनम सल्फेटचाही वापर केला जाऊ शकतो. गंधक किंवा पिट मॉस सारखी आम्लयुक्त सामग्रीही जमिनीचा सामू कमी करण्यासाठी घाला.
समस्येचे स्त्रोत काय आहेत या प्रमाणे जमिनीतील क्षाराची पातळी बदलणे हे विविध प्रकारांनी केले जाऊ शकते. ज्या जमिनीत पुरेशी चुनखडी नाही आणि सोडियम क्षार जास्त आहेत तिथे जिप्समचा वापर जमिनीत बदल करण्यासाठी सर्वसाधारणपणे केला जातो. याचे परिणाम चांगले मिळण्यासाठी शेतात पाणी भरुन नंतर मोठ्या प्रमाणात पाण्याचा निचरा केला पाहिजे म्हणजे मुळांच्या भागातुन क्षार निघुन जातील. जिप्सममधील विरघळणारा कॅल्शियम क्षाराच्या कणांना हलवितो आणि ते जास्तीच्या पाण्याबरोबर वाहून जातात. ज्या जमिनीत पुरेसे कॅल्शियम कार्बोनेट आहे त्या जमिनीतील गंधक किंवा केंद्रीत सल्फ्युरिक आम्लाचाही उपयोग जिप्समच्या ऐवजी जमिनीत केला जाऊ शकतो. कॅल्शियम क्लोराइड (CaCl2) किंवा युरियावर आधारीत खत योजनासुद्धा क्षारपट जमिनींना नीट करण्यासाठी वापरले जातात.
क्षारतेचा संदर्भ जमिनीतील कणांशी आहे ज्यामुळे जमिनीचा सामू वाढलेला असतो. हे वैशिष्ट्य चिकणमातीत, सॉडिक किंवा क्षारपट जमिनीत दिसते जिथे जमिनीचा कस आणि सैलपणा कमी असतो. क्षारतेमुळे मुळांचे नुकसान होते आणि त्यांची जमिनीतुन पाणी आणि आवश्यक पोषके शोषण्याची क्षमता कमी होते. मुळांची वाढ चांगली होत नसल्याने झाडाची वाढ खुंटते. अल्कधर्मी जमिनीत झाडांना आवश्यक पोषकांची उपलब्धता होत नाही आणि परिणामी स्फुरद आणि जस्ताची कमतरता होते आणि लोहाची तसेच बोरॉनची विषाक्तताही होऊ शकते. भातशेतात पाणी भरलेले असल्याकारणाने जमिनीचे उच्च सामू ही गंभीर समस्या म्हणुन विचारात घेतली जात नाही. तथापि, ते कोरडवाहू भागात कमी पावसामुळे किंवा सिंचित क्षेत्राच्या अंतर्गत पाणी कमी पोचत असल्यास झाडाच्या वाढीला प्रभावित करू शकते. अर्ध शुष्क भागात क्षारतेमुळे ही लक्षणे दिसणे सर्वसामान्य आहे.