भात

भाताच्या ओंबीवरील कोळी

Steneotarsonemus spinki

कोळी

थोडक्यात

  • पर्णकोषाच्या आत कोळ्याने रस शोषण केल्याने रंगहीनता येते.
  • ओंबीतील उपद्रवाने नपुंसकता येते, दाणे विकृत होतात, ओंब्या सरळ ताठ रहातात आणि "पोपटाच्या चोचीसारखे" दाणे होतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

भात

लक्षणे

पर्णकोषाच्या मागे उपद्रव चालतो आणि तपकिरी ते गडद तपकिरी धब्बे दिसल्याने ओळखता येतो. वरचा कोष बाजुला केल्यास कोळी थेट दिसु शकतात. कोळी पोटरी अवस्थेपासुन कोवळे दाणे भरेपर्यंत वाढणार्‍या ओंबीवर रस शोषण करतात. प्रादुर्भावामुळे संधीसाधु बुरशीचे जंतु वाढणार्‍या दाण्यात आणि पर्णकोषात (उदा. जे कोषाची कुज करतात) आत प्रवेश करतात, परिणामी ओंबीला, रोपाला नपुंसकता येते, दाणे विकृत होतात, ओंबी सरळ ताठ रहातात आणि "पोपटाच्या चोचीसारखे" दाणे होतात. हे जगभरातील भात पिकावर हल्ला करणारे सर्वात महत्वाचे आणि विध्वंसक कोळी आहे.

शिफारशी

जैविक नियंत्रण

किटकनाशकाच्या अतिवापराने भातशेतीवरील या कोळ्याचे नैसर्गिक शत्रू प्रभावित होऊ नये याची काळजी घ्या.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जास्तच संक्रमण झाले असता, हेक्झिथियाझॉक्स किंवा गंधकाच्या संयुंगांची फवारणी करा. फवारण्याआधी शेतात पाणी भरा म्हणजे कोळी झाडाच्या वरच्या भागात स्तलांतर करेल व त्यामुळे या फवारणीची कार्यक्षमता वाढेल.

कशामुळे झाले

स्टेनियोटारसोनेमस स्पिंकि नावाच्या भाताच्या ओंबीवरील कोळीमुळे ही लक्षणे उद्भवतात. उच्च तापमान आणि कमी पाऊस यांची संख्या वाढण्यास अनुकूल असतात. तापमान २५.५ ते २७.५ डिग्री सेल्शियस आणि ८० ते ९०% आद्रता ही अतिशय मानवते. सतत फक्त भातशेती केल्याने आणि हत्यारे/अवजारे वर्षभर एका शेतातुन दुसर्‍या शेतात नेल्याने यांचा प्रसार चांगला होतो. भाताच्या झाडावरील प्रादुर्भाव संपूर्ण वर्षभर होऊ शकतो. तथापी, त्यांची संख्या पोटरी अवस्थेत सर्वात जास्त असते आणि पीक परिपक्व झाल्यास कमी होते. नुकसानाचे वेगळे वैशिष्ट्य दर्शवणे कठीण असते कारण कोळी सामान्यतः भाताच्या अन्य रोगांशी जसे की सारोक्लाडियम ओरेझे (पर्णकोष कुजवा) आणि बुरखोल्डेरिया ग्लुमे (जिवाणूजन्य ओंबी मर) सह संक्रमण करतो.


प्रतिबंधक उपाय

  • कोळ्यांच्या लक्षणांसाठी शेताचे नियमित निरीक्षण करा.
  • पीक घेतल्यानंतर नांगरण्यापूर्वी शेतात तूस पसरुन जाळा.
  • पीक घेतल्यानंतर जमिन दोन अठवडे पडिक ठेवा.
  • एका ओळीत दाट लागवड करा.
  • संतुलित एनपीकेचे प्रमाण असलेल्या सुपिक जमिनीत लागवड करा.
  • शेतातुन आणि आजुबाजुने तण नियंत्रण कर.
  • कोळ्याचे जीवनचक्र मोडण्यासाठी भाताचा, वाल किंवा शेंग वर्गीय पिकांबरोबर पीक फेरपालट करा.
  • शेतीच्या चांगल्या सवयी बाळगा शेतीउपयोगी अवजारे स्वच्छ ठेवा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा