Melanitis leda
किडा
हिरव्या शिंगांचे सुरवंट पानांच्या खालच्या बाजुला मध्य शिरेला समांतर विश्रांती घेतात, आणि रात्री पाने खातात. पान मध्य शिरेच्या बाजुने खाल्ले जाते आणि मोठ्या प्रमाणात पानांचे भाग खाल्ले जातात त्यात थोड्या जाडसर इतर शिराही येतात. नुकसान बरेचसे भातावरील स्किप्पर आणि हिरव्या उंट अळीने खाल्ल्यासारखेच असते म्हणुन सुरवंटाना शोधणे महत्वाचे आहे ज्यामुळे नुकसान नेमके कोणत्या जातीमुळे झाले आहे ते ओळखता येते. अळ्या इतर भरपूर प्रकारच्या यजमानांनाही खातात ज्यामुळे त्यांचा जीवनक्रम पुरा होऊ शकतो आणि शेतातील त्यांचा विकास अबाधित राहू शकतो.
हिरव्या शिंगाच्या सुरवंटाचे नैसर्गिक शत्रु आहेत चॅलसिड वॅस्पस (ट्रायकोग्रामा प्रजाती) आणि टॅकिनिड माशांच्या दोन प्रजाती ज्या अळ्या खातात. काही व्हेस्पिड वॅस्पसच्या प्रजाती अळ्यांना खातात. बहुधा हा उपद्रव कमी संख्येने होतो आणि मित्र किड्यांची संख्या जास्त असल्यामुळे, झाडे यांच्या खाण्याच्या नुकसानापासुन स्वत:ला सावरु शकतात.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. खास करुन मेलॅन्टिस लेडा इस्मेनेविरुद्ध कोणतेही रसायनिक उपाय नाहीत. विस्तृत श्रेणीची कीटकनाशके कीटक नष्ट करू शकतात, परंतु त्याच वेळी त्यांच्या नैसर्गिक शत्रूंना मारू शकतात त्यामुळे गंभीर संक्रमण झाले असेल तरच या प्रकारच्या कीटनाशकांची शिफारस करण्यात येते.
मेलॅनीटिस लेडा या जातीच्या हिरव्या शिंगांच्या सुरवंटांमुळे पानावरील लक्षणे उद्भवतात पण मायकॅलेसिस कुटुंबातील इतर प्रजातीही यात सहभागी असु शकतात. हे किडे सर्व प्रकारच्या भात शेतीत पाहीले जाऊ शकतात आणि कोरडवाहू शेतीत तर ते सर्वसामान्यपणे आढळून येतात. प्रौढ मोठी सोनेरी तपकिरी फुलपाखरे असतात ज्यांच्या पंखांवर वैशिष्ट्यपूर्ण डोळे असतात. विशेषतः हे किडे प्रकाश सापळ्याला आकर्षित होत नाहीत. माद्या चकचकीत मोत्यासारखी अंडी पानांवर रांगेत घालतात. अळ्या भाताच्या पानात त्यांच्या पिवळ्या हिरव्या रंगामुळे सहज मिसळुन जातात आणि त्याच्या शरीरावर बारीक पिवळ्या मण्यांसारखे केस असतात. त्यांच्या डोक्यावर दोन प्रमुख तपकिरी शिंगे असतात ज्या त्यांना त्यांचे सामान्य नाव देतात. ते शेतातील त्यांचा सतत विकास होण्यासाठी पर्यायी यजमानांवर जगतात. कोषावस्था पानातच पार पडते. हिरव्या शिंगाचे सुरवंट भातावरील किरकोळ उपद्रव आहे. त्यांची संभाव्य तीव्रता साधारणपणे खूप कमी असल्याने उत्पादनात मोठी घट होत नाही.