भात

मंडल अळी

Hydrellia philippina

किडा

थोडक्यात

  • पानांवर पिवळे ठिपके, पांढरे किंवा पारदर्शक डाग किंवा पट्टे आणि सुईच्या टोकाच्या आकारची छिद्र दिसतात.
  • पाने विकृत होतात आणि झाडाची वाढ खुंटते.
  • काही वेळा दाणे पूर्ण भरत नाहीत.
  • पारदर्शक ते आळी हे फिकट गव्हाळ रंगाची असते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

भात

लक्षणे

एच. फिलिप्पिनाच्या अळ्या न उमललेल्या पानांच्या आतील कडा खातात. जशी ती पाने हळुहळु उमलतात, त्याच्या आतील कडांजवळ खाल्ल्यामुळे पिवळे ठिपके, पांढरे किंवा पारदर्शक डाग किंवा पट्टे आणि सुईच्या टोकाच्या आकारची छिद्र दिसतात. प्रभावित पाने विकृत होतात आणि वार्‍याने गळतात. अळ्या मुख्य पानांनाही खातात ज्यांच्या पात्यांवर बारीक छिद्र दिसतात आणि कडा रंगहीन होतात. जर जर ते विकसनशील ओंबीपर्यंत पोहचले, तर त्यात दाणे कमी भरलेले आढळून येतात. सहसा, भाताचे झाड या व्होर्ल अळ्यांच्या नुकसानाला भरुन काढते आणि लक्षणे कांडे येण्याच्या सुमारापर्यंत अदृश्य होतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

ओपियस, टेट्रास्टिचस आणि ट्रायकोग्रामाचे बारीक वॅस्पस अंडी आणि अळ्या खातात. अंडी खाणार्‍या भक्षकात डोलिकोपस, मेडेटेरा आणि सिन्टोर्मॉन माशा येतात. ऑक्थेरा ब्रेविटिबायालिस जातीच्या एफिड्रीड माशा आणि ऑक्झिपेस जावानस, लिकोसा स्युडोन्युलाटा आणि नियोस्कोना थेसि जातीचे कोळी प्रौढांना खातात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. बहुधा एच. फिलिप्पिनाची लक्षणे पोटरी अवस्थेच्या सुमारास नाहीशी होतात आणि कीटनाशकांद्वारे नियंत्रण करण्याची शिफारस केली जात नाही. गंभीर संक्रमण झाले असता, मुळाजवळ एकाच ठिकाणी दाणेदार कार्बोफ्युरॉन कोळसा किंवा निमतेल घातले असता परिणामकारकरीत्या नियंत्रण होते खासकरुन रब्बी मोसमातील किंवा उशीरा लागवड केलेली असल्यास.

कशामुळे झाले

हायड्रेलिया फिलिप्पिना या अर्धजलवासी अळ्यांमुळे लक्षणे उद्भवतात. हे नागअळीच्या कुटुंबातील आहेत पण फरक एवढाच कि हे पाने उमलण्याच्या आधी खातात ज्यामुळे पात्यावर करपट व्रणांच्या विशिष्ट संरचना दिसतात. सिंचन केलेल्या शेतात, तलावात, प्रवाहात आणि सरोवरात किंवा जिथे भरपूर हिरवाई आणि शांत अथांग पाणी आहे तिथे दिसतात. वर्षभर सतत फक्त भात शेती आणि कोवळ्या रोपांची लागवड याच्या वाढीस पूरक आहे. तरीपण हे थेट पेरणी केलेल्या शेतात, गादी वाफ्यांवर किंवा पाण्याचा निचरा केलेल्या शेतात जास्त दिसत नाहीत. पूर्ण वाढ झालेल्या अळ्या खाल्लेल्या झाडाच्या खोडाबाहेर कोषावस्थेत जातात. प्राथमिक यजमान भात आहे पण ते ब्राचिरिया, सिनोडॉन, एचिनोक्लोआ, लीरसिया, पॅनिकम आणि जंगली भात यांसारख्या गवतांच्या प्रजातींवर देखील उपजीविका करतात.


प्रतिबंधक उपाय

  • आपल्या भागात उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाण लावा.
  • थेट शेतातच पेरणी करा किंवा गादी वाफ्यावर रोप तयार करा कारण प्रौढ याकडे आकर्षित होत नाहीत.
  • नत्राची संयुगे जास्त वापरु नका.
  • पीकयोजना अशी करा कि झाडोरा लवकर पाण्याचा पृष्ठभाग व्यापेल ज्यामुळे पीक या किड्यांना संवेदनशील रहाणार नाही.
  • पाण्याच्या पृष्ठभागावर अॅझोला आणि सॅल्विना मोलेस्टाचे आच्छादन दिल्यास हा प्रादुर्भाव प्रतिबंधित येतो.
  • लागवड केल्यानंतर पहिल्या ३० दिवसात नियमित अंतराने पाण्याचा निचरा करा.
  • सार्वजनिक कीटकनाशकांचा गैरवापर टाळा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा