इतर

पानांवरील शारीरिक डाग

PLS

इतर

थोडक्यात

  • पानांवरील लक्षणे विविध असतात आणि डागही वेगवेगळ्या आकारांचे आणि रंगांचे असतात.
  • रोपाच्या सर्व पानांवर ठिपक्यांची नक्षी असते, जी पानांच्या शिरांनी आणि धारदार कडांनी अडविली जाते (विरुद्ध जुन्या आणि बुरशीने ग्रासलेल्या पानांपुरतीच मर्यादित).

मध्ये देखील मिळू शकते

2 पिके

इतर

लक्षणे

पानांवरील डागांची लक्षणे आकाराने आणि रंगाने, पिकाप्रमाणे, वाणाप्रमाणे, मोसम आणि व्यवस्थापनाच्या प्रकाराप्रमाणे फारच बदलतात. काही धना्यात पिवळे किंवा नारिंग सुईच्या टोकाइतके छोटे ठिपके दिसतात तर इतरात तपकिरी किंवा लालसर तपकिरी ठिपके दिसतात. काही बाबतीत डाग मोठे होऊन पाणी शोषल्यासारख्या बोटांच्या ठशांसारखे धब्बे तयार होतात. ह्या लक्षणांची, गव्हाळी ठिपके, जाळीदार धब्बे आणि सेप्टोरिया नावाच्या बुरशीमुळे झालेल्या ठिपक्यांशी गल्लत होऊ शकते. तरीपण जर कारण हे शारीरिकच असेल तर ठिपके रोपाच्या सर्व पानांवर उपस्थित असतात, तर बुरशीमुळे होत असतील तर बहुधा झाडीच्या खालच्या बाजुने सुरु होतात. आणखी एक मुख्य फरक आहे कि ह्या शारीरिक ठिपक्यांच्या धारदार कडा पानाच्या शिरांनी सीमित होतात (बुरशीच्या विरुद्ध).

शिफारशी

जैविक नियंत्रण

सध्यातरी पानांवरील शारीरिक डागांसाठी कोणतेही जैव नियंत्रक उपचार उपलब्ध नाहीत. जर आपणांस माहिती असले तर आम्हाला जरुर कळवा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जिथे जमिनीचा सामू निष्पक्ष किंवा कमी असतो, तिथे केसीएलच्या रुपात पोटॅश घातल्याने लक्षणे सुधारतात किंवा नाहीशी होताना काही वाणात पाहिले गेले आहे. उच्च सामू असलेल्या जमिनीत पोटॅश देणे हे काही काळा करीताच काम करते.

कशामुळे झाले

पानांवरील शारीरिक ठिपके हे बहुधा रब्बीच्या गव्हात पाहिले जातात पण इतर धान्येही प्रभावित होऊ शकतात. ही विकृती पर्यावरणीय घटकांमुळे पेशींच्या ऑक्सिडेशनमुळे होते असे मानले जाते, उदा. वरच्या पानांना जास्त उन्हाने नुकसान किंवा जमिनीत क्लोराइड नसणे. इतर ताण जसे कि थंड, ढगाळ आणि ओले हवामान यानंतर लगेच उष्ण, उन्हाची परिस्थिती, ह्यामुळे सुरु होऊ शकते. पर्णकोशाच्या बुडाशी परागकण आणि पाणी जमा होणे ह्यामुळेही शारीरिक डाग येऊ शकतात. शारीरिक डागांच्या लक्षणांची, गव्हाळी ठिपके, जाळीदार धब्बे आणि सेप्टोरिया नावाच्या ठिपक्यांशी गल्लत होऊ शकते. तरीपण, ह्या जंतुंविरुद्ध, शारीरिक डागांमुळे पिकावर प्रभाव पडत नाही. म्हणुन बुरशीनाशकांचा वापर करण्यापूर्वी हे डाग रोगांमुळे आलेले आहेत कि नाहीत हे समजुन घेणे महत्वाचे आहे.


प्रतिबंधक उपाय

  • आपल्या भागात उपलब्ध असल्यास लवचिक वाण लावा.
  • पिकाची रोगासाठी निदान प्रयोगशाळेत नियमित तपासणी करा.
  • कमी क्लोराइड पातळीच्या जमिनी टाळा आणि ह्या पोषकासाठी मातीचे नियमित निरीक्षण करा.
  • (जर जमिनीचा सामू कमी असेल तरच) केसीएल रुपातील पोटॅश खतांना पूरक म्हणुन द्या .

प्लँटिक्स डाऊनलोड करा