मॅनिओक

अरारुटवरील खपली

Aonidomytilus albus

किडा

थोडक्यात

  • फांद्या, कोंब आणि काहीवेळेस पानाचे काही भाग प्रभावित होतात.
  • पांढर्‍या पिल्लांनी आणि स्त्रावांने अच्छादिले जातात.
  • फांद्या वाळतात आणि वार्‍याने तुटतात.
  • झुडपासारखे दिसतात.
  • अंडाकृत, शिंपल्यासारखे खवल्यांवर रुपेरी पांढरे आच्छादन असते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
मॅनिओक

मॅनिओक

लक्षणे

पिल्ले फांदीभोवताली रस शोषण करण्यासाठी गोळा होतात व फांदीला अखेरीस पांढर्‍या स्त्रावाने "आच्छादतात". बाजुचे फुटवे, पर्णकोष आणि पानाचे खालचे भागही क्वचित संक्रमित होतात. पाने फिकट होतात, मरगळतात आणि गळतात, तर गंभीर प्रादुर्भाव झाल्यास झाडाची वाढ खुंटते. शेतातील संक्रमण लागवडीच्या वेळी संक्रमित कलमे लावल्यास त्याच्या आजुबाजुला दिसते. पिल्लांनी जास्त उपद्रव केल्याने फांद्या वाळुन कमजोर होतात आणि नुसत्या वार्‍यानेही तुटतात. तुटलेल्या फांद्यांची भरपाई करण्यासाठी झाड नविन फुटवे काढते, ज्यामुळे संक्रमित झाडावर भरपूर फांद्या धरुन झुडपासारखे दिसते. या झाडांची मूळ चांगली विकसित होत नाहीत आणि कंद खाण्याच्या लायकीचे नसतात. जी झाडे किडींच्या हल्ल्याने आणि दुष्काळाने कमजोर झालेली असतात त्यावरील लक्षणे खूप जास्त आढळतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

लागवडीपूर्वी कलमांना अरारुट मुळाच्या अर्कात ६० मिनिटे बुडवुन ठेवल्याने ए. अल्बस मरते. गरम पाण्यात बुडवुनही वापरले जाऊ शकते पण ते कमी प्रभावी आहे. असेही दिसुन आले आहे कि कलमांना साठवणीत उभे सरळ ठेवल्यानेही संक्रमण कमी होते. काही कोसिनेलिड बिटल्स भक्षक जसे कि चिलोकोरस निग्रिटसही खवले किडींची लोकसंख्या कमी करण्यात मदत करतात. जमिनीची सुपिकता सेंद्रीय सामग्रीसह सेंद्रीय खते देऊन वाढविल्यासही मदत होते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. प्रतिबंधक उपाय म्हणुन डायमिथोएट, डायाझिन, मिथाइल डेमेन्टन किंवा मॅलाथियॉन (द्रावणाप्रमाणे ०.०१ ते ०.०५%) ची फवारणी किंवा फांदी या द्रावणात ५ मिनिटे बुडवल्याने साठवणीच्या काळात संक्रमणाचा प्रतिबंध होतो. कलमांना मॅलाथियॉन, डायाझिन किंवा डायमिथोएटच्या द्रावणात लागवडीपूर्वी बुडवल्याने अरारुटवरील खवल्यांचे संक्रमण टाळता येते.

कशामुळे झाले

आयोनिडोमयटिलस अल्बस नावाच्या खवले किड्यांमुळे लक्षणे उद्भवतात. हे झाडांचे रसशोषण करतात आणि त्यावरच रहातात, ह्यांचा प्रसार वार्‍याने किंवा प्राणी/मानवांच्या स्पर्शाने होतो. संक्रमित झाडाच्या सामग्रीचे वहन जसे कि पुनर्लागवडीसाठी कलम, ह्यातुनही रोगाचा प्रसार सुदूर अंतरावर होतो. माद्या झाडांचे रसशोषण करतात आणि फुटव्यांखाली अंडी घालतात. काही दिवसातच अंडी ऊबुन पिल्ले बाहेर येतात आणि झाडाच्या इतर भागांवर रांगत जातात जिथे त्यांचे पाय गळतात आणि ती पिल्ले सरपटणार्‍या किड्यात बदलतात. पिल्ले अधाशीपणे फांदीतील रस शोषतात आणि त्यांना वाळवितात. प्रौढ पांढरा मेणचण स्त्राव सोडतात जो विकसित होऊन अंडाकृती शिंपल्याच्या आकाराचा रुपेरी पांढर्‍या आच्छादनाचा खवला बनतो. नराला पंख असतात आणि कमी अंतरापर्यंत उडू शकतात तर माद्या पंखहीन असतात आणि सरपटतात. भरपूर पाऊस आणि जोराचा वारा किड्यांना इतर झाडांवर पसरवतो. ह्याविरुद्ध लांबलेली कोरडी हवामान परिस्थिती झाडांना जास्त संवेदनशील करते आणि ह्यांच्या प्रसारास बढावा देते.


प्रतिबंधक उपाय

  • शक्य झाल्यास प्रमाणित स्त्रोताकडील खवलेमुक्त कलमच लागवडीसाठी वापरा.
  • आपल्या भागात उपलब्ध असल्यास (पुष्कळशी वाणे आहेत) प्रतिकारक वाणेच लावा.
  • निरोगी फांद्यांना सावलीत सरळ उभे ठेवावे म्हणजे वारा खेळता राहून मंद सूर्यप्रकाश मिळेल.
  • लागवडीच्या वेळी रोपांमध्ये अंतर पुरेसे ठेवल्याने खवल्यांच्या उद्रेकाची जोखीम कमी होते.
  • शेताचे निरीक्षण करुन संक्रमित झाडे नष्ट करा.
  • संक्रमण पुढच्या हंगामात राहू नये म्हणुन पीक फेरपालट करावा.
  • पुनर्लागवड करताना किमान तीन दिवस आधी शेत स्वच्छ करुन घ्यावे.
  • रोगाच्या लक्षणाकरता निर्यात आणि आयात केलेली कलमे तपासावी.
  • संक्रमित अरारुट सामग्रीचे वहन करु नये, तर लगेच जाळुन किंवा खोल पुरुन टाकावी.
  • कीटनाशकांचा वापर अतिरेकी करु नये कारण ह्यामुळे खवल्यांचे नैसर्गिक भक्षकही मारले जातील.

प्लँटिक्स डाऊनलोड करा