Mononychellus tanajoa
कोळी
हे कोळी बहुधा कोवळ्या पानांच्या खालच्या बाजूला, हिरव्या फांद्यांवर आणि अरारुटाच्या फुटव्यांना प्रादुर्भाव करतात. त्यांची सोंड प्रत्येक पेशीत टोचुन आतील हरितद्रव्यसह इतर द्रव्यही शोषण करतात. ह्यांनी प्रभावित केलेल्या पानांवर बारीक पिवळसर ठिपके आढळून येतात. जास्त प्रभावित पानांवर पुटकुळ्या येतात व त्याची वाढ कमी होऊन वाळते व नंतर गळते. शेंड्यावरील प्रादुर्भावामुळे वैशिष्ट्यपूर्ण 'मेणबत्ती' सारखी लक्षणे येतात, जे शेंडा करपणे व गळणे संदर्भित करतात. २-९ महिन्यांचे अरारुटचे झाड संक्रमणास अत्यंत संवेदनशील असते. कोळीच्या गंभीर प्रादुर्भावामुळे कंद उत्पन्नात २०-८०% नुकसान होते. ह्याहीपेक्षा अधिक म्हणजे अरारुटाचे खोडही कमजोर होते ज्यामुळे पुढील हंगामातील पीक लागवडीच्या सामग्रीची कमतरता भासते.
कोळीची लोकसंख्या कमी करण्यात अनेक भक्षक प्रजातींचे अहवाल आहेत. अँब्लिशियस लिमोनिकस आणि ए. आयडेयसनी हिरव्या कोळ्यांची लोकसंख्या ५०%नी कमी केलीय. भक्षक कोळी टायफ्लोड्रोमालस अरिपो आणि टी. मॅनिहोतीनी आफ्रिकेतील अनेक देशात ठाण मांडुन अरारुटवरील हिरव्या कोळीची लोकसंख्या सफलतेने नियंत्रित केली आहे. अरारुटवरील हिरव्या कोळीला मारण्यात परजीवी बुरशी नियोझायगाइटसनेही अनेक देशात चांगले परिणाम दिलेत. निंबोळी तेल द्रावणेही समाधानकारक परिणाम देतात.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. मोनोनिचेलस टँजोआच्या रसायनिक नियंत्रणाची शिफारस केली जात नाही कारण ह्यामुळे प्रतिकार निर्माण होऊन रोगाचा दुय्यम उद्रेक होऊ शकतो. फक्त कोळीनाशक अॅबामेक्टिनच उपद्रवाच्या नियंत्रणात प्रभावी ठरते.
मोनोनिचेलस टँजोआ आणि मोनोनिचेलस प्रोग्रेसिव्हस नावाच्या हिरव्या कोळीच्या प्रादुर्भावामुळे लक्षणे उद्भवतात. ते कोवळ्या पानांच्या खालच्या बाजुला, आपली सोंड प्रत्येक पेशीत टोचुन रस शोषण करतात. त्यांना जरी अरारुटवरील दुय्यम उपद्रव मानले गेले असले तरी अनुकूल परिस्थिती असल्यास उदा. कोरड्या हंगामात, ते चांगलच नुकसान करु शकतात. कोळी एका झाडावरुन दुसर्या झाडावर जाऊ शकतात, पण वारा तसेच पावसाचे उडणारे पाणीही ह्यांना पसरवतो. ६० दिवसांपर्यंत ते कलमावर जगु शकतात, ह्यांचा मुख्य वाहक बहुधा शेतकरी स्वत:च असतात, जे संक्रमित लागवड सामग्री एका शेतातुन किंवा बागेतुन दुसरीकडे नेतात. कोळीची पिल्ले हिरवी असतात आणि नंतर प्रौढ होताना पिवळसर होतात. त्यांच्या शरीराचे विभाजन करुन एकसंध रहाण्यावरुन त्यांना ओळखले जाते. प्रौढ माद्या ह्या नरांपेक्षा मोठ्या आकाराच्या असतात आणि ०.८ मि.मी. आकाराच्या असतात.