Clarohilum henningsii
बुरशी
अरारुटाची संक्रमित किंवा गळलेल्या पानांत बुरशी तग धरते. वार्याने किंवा पावसाच्या उडणार्या पाण्याने हिचे वहन नविन पानांवर आणि झाडांवर होते. एम. हेनिनग्सिमुळे छोटे, गोलाकार, हिरवट पिवळ्या ठिपक्यातुन डाग तयार होतात. जसे हे डाग मोठे होतात तसे ते पानांच्या प्रमुख शिरांनी अडतात आणि कोनाकृती धब्बे तयार होतात. डागांच्या वरच्या भागाचा रंग, विविध आकाराचे, गव्हाळ ते फिकट गव्हाळ भाग असुन गडद तपकिरी कडा थोडे उंचवटलेले असतात. काहीवेळा, या धब्ब्यातुन जाणार्या पानांच्या छोट्या शिरा या काळ्या वाळलेल्या रेषांसारख्या दिसतात. कालांतराने डागांचे केंद्र वाळते. गंभीर संक्रमणात पानांवरील डागांसभोवती पिवळी प्रभावळ दिसते जी प्रगत होणार्या बुरशीच्या भागांनी विष तयार केल्याने होते. अखेरीस डाग एकमेकात मिसळतात आणि पूर्ण पान व्यापतात ज्यामुळे अकाली पानगळ होते. पानांच्या खालील पृष्ठभागावरील भाग राखाडी आणि थोडेसे अंधुक असतात.
या बुरशीचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी कोणतेही जैविक नियंत्रक उपाय उपलब्ध नाहीत. रोग टाळण्यासाठी, रोगमुक्त लागवड सामग्रीचा वापर आणि उचित प्रतिबंधक उपाय करणे आवश्यक आहे. बुरशी अरारुटच्या संक्रमित किंवा गळलेल्या पानांत रहाते. नविन पानांवर आणि झाडांवर हिचा प्रसार वार्याने किंवा पावसाच्या उडणार्या पाण्याने होतो.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. थायोफेनेट (०.२०%), क्लोरथॅलोनिल असणार्या बुरशिनाशकांची फवारणी करुन अरारुटच्या पानांवरील तपकिरी ठिपक्यांचे नियंत्रण प्रभावीपणे केले जाऊ शकते. कॉपर बुरशीनाशके, मेटालॅक्झिल आणि मँकोझेबचीही शिफारस केली जाते.
मायकोस्फेरेला हेनिनग्सि नावाच्या बुरशीमुळे लक्षणे उद्भवतात जी अरारुट झाडाच्या संक्रमित पानांत किंवा गऴलेल्या अवशेषात रहाते. अनुकूल हवामानात हिचा प्रसार वार्याने किंवा पावसाच्या उडणार्या पाण्याने होतो. हिचे बीजाणू खरतर वाळलेल्या डागांखाली पानांच्या खालच्या बाजुला निर्माण होतात. उबदार, आर्द्र हवामान परिस्थिती बुरशीच्या जीवनचक्रास मानवते आणि रोगाची गंभीरता वाढवते. लांब अंतरापर्यंत हिचा प्रसार तेव्हा होतो जेव्हा संक्रमित झाडाची सामग्री दुसर्या शेतात किंवा बागेत नेली जाते. एकुणच कोवळ्या पानांपेक्षा जुनी पानेच ह्या रोगास जास्त संवेदनशील असतात.