Rhizoctonia solani
बुरशी
हा रोग मुख्यत्वेकरुन मुळांवरच परिणाम करतो ज्यामुळे नविन उगवणारी रोपे अतिशय कमजोर, वाढ खुंटलेली आणि कमी पीक देणारी असतात. ह्याच्या लक्षणांमध्ये येतात मुळांवर दबलेले डाग आणि तपकिरी किंवा काळी रंगहीनता, आक्रसणे आणि सडणे. जर मुळे विकसित झालीच तर त्यांच्या गाठी फारच कमी, छोट्या आणि रंगाने फिकट असतात. बाधीत बियाणातुन उगवणारी रोपे उगवल्यानंतर काही काळातच भाजल्यासारखी दिसतात. जी रोपे तग धरतात ती क्लोरोटिक असुन कमजोर असतात. जर रोपांच्या वाढत्या काळात लागण झाली तर वाढ खुंटते. संधीसाधु जंतु घर करतात आणि त्याच्या मरणार्या भागांना खातात, ज्यामुळे लक्षणे अधिकच खराब दिसतात. शेतात, हा रोग नेहमी भागाभागातुन होतो आणि जर हवामान जंतुंना अनुकूल असेल तर फैलावतो.
फारच थोड्या प्रमाणात किनेटिनच्या द्रावाचा वापर किंवा ट्रीचोडर्मा हार्झियानम बुरशीशी संबंधीत बियाणे भिजविण्यासाठी वापरल्यानेही जमिनीतुन होणारे रोग जसे कि मसुरीच्या मुळांचे सडणे ह्यावर नियंत्रण ठेवता येते. ह्याबरोबरच ते जगलेल्या रोपांची वाढ तसेच पीक चांगले करण्यातही मदत करतात. ह्या उत्पादांच्या मोठ्या प्रमाणावर शेतातील चाचण्या सध्या सुरु आहेत.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. एकदा का बुरशीने रोपाच्या टिश्युंमध्ये घर केले कि ह्याविरुद्ध कोणतेही उपचार करणे शक्य नाही. थियाबेन्डाझोलसोबत कार्बाथीन, कार्बाथीनसोबत थिरामच्या बियाणावरील उपचाराने रोपे उगविण्याची आणि स्थर रहाण्याची प्रक्रिया चांगली होते. इतर बुरशीनाशकेही उपलब्ध आहेत.
ही लक्षणे जमिनीतील बुरशींच्या जटिल जंतुंमुळे उद्भवतात जे रोपांना वाढीच्या टप्प्यांवर संसर्गित करतात. र्हिझोक्टोनिया सोलानी आणि फ्युसॅरियम सोलानी ह्या जटिलतेचा हिस्सा आहेत जसे गटातील इतर आहेत, हे जमिनीत खूप काळपर्यंत जगु शकतात. जेव्हा वातावरण अनुकूल असेल तेव्हा मुळांच्या टिश्युंमध्ये घरे करतात आणि रोपाच्या वरच्या भागापर्यंत पाणी आणि पोषण पोहचु देत नाहीत, ज्यामुळे रोपे मरगळतात आणि क्लरोटिक होतात. जसे ते रोपाच्या टिश्युंमध्ये वाढतात, त्यांच्याबरोबर बहुधा एसे बुरशीही रोपाच्या मुळांच्या सामान्य वाढीला आणि मुळांच्या गाठी होण्यालाही अडथळा करते. थंड आणि ओली माती मोसमाच्या सुरवातीला ह्या रोगाच्या वाढीला मदत करते. खर तर ही लक्षणे पुष्कळदा पाणी साचणे आणि पाणथळ भागाशी संलग्न असतात. शेवटी पेरणीची तारीख आणि किती खोल पेरणी केली आहे ह्याचा पुष्कळच परिणाम रोप कसे उगवेल आणि पीक किती येईल ह्यावर होतो.