Anguina tritici
इतर
काही वेळा, ए. ट्रीटिसीने संसर्गितरोपे कोणतीही दृष्य लक्षणे दर्शवित नाहीत. रोगसूचक रोपात, पाने थोडी विकृत असतात आणि त्याच्या वरच्या बाजुला थोडे उंचावलेले भाग आणि खालच्या बाजुला खोलगट भाग असतात. सुरकुतणे, मुडपणे, कडांचे मध्यभागाकडे गुंडाळणे किंवा इतर प्रकारची विकृती हे इतर लक्षणात येते. रोपे फिकटहिरवी होतात किंवा सुकतात, खुजी किंवा ठेंगणी असतात आणि फांद्या वाकु शकतात. कणसे छोटी असतात आणि त्याची साल अनैसर्गिक कोनात बाहेर येते. हे गुणधर्म रायच्या कणसात दिसत नाहीत. काही बियाणे गाठीत बदलते ज्यात सूत्रकृमींचे सुकलेले पुंजके असतात. ह्या गाठी छोट्या, जाड्या आणि इतर निरोगी बियाणांपेक्षा वजनाला हलक्या असतात, आणि त्या जुन्या होत जातात तसा त्यांचा रंग (गव्हाळीच्या ऐवजी) फिकट तपकिरी ते काळा होतो.
साध्या मिठाच्या पाण्यात (१ किलो प्रति ५ ली. पाणी) बियाणे घालुन जोराने ढवळावे. ह्या प्रकारे रोगी बियाणे आणि कचरा पृष्ठभागावर तरंगतो आणि तिथुन गोळा केला जाऊ शकतो, वाफ देणे, उकळणे किंवा रसायनिक उपचार करुन सूत्रकृमींना मारता येते. निरोगी बियाणे ह्या द्रावणात खाली बुडाशी बसतात, त्यांना पुष्कळ वेळा स्वच्छ पाण्याने धुवुन, सुकवुन पेरण्यासाठी वापरले जाऊ शकते. बियाणांना ५४-५६ डिग्री सेल्शियस गरम पाण्यात १०-१२ मिनीटांसाठी घातल्यानेही सूत्रकृमी मरतात. शेवटी गाठी बियांपेक्षा आकाराने बारीक असल्याने यांत्रिक चाळणीनेही वेगळ्या केल्या जाऊ शकतात. सूत्रकृमीनाशके दिलेली रोपे, बियाणे स्वच्छ केल्याने मिळणार्या ए. ट्रीटिसीच्या नियंत्रणाइतकी परिणामकारक नसतात.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ह्या उपद्रवासाठी कोणतेही रसायनिक उपचार उपलब्ध नाहीत. पाण्यात तरंगणे, गरम पाण्याचे उपचार किंवा गुरुत्वाकर्षणाप्रमाणे बियांची प्रक्रिया याद्वारे बियाणे स्वच्छ करण्याने आणि बियांणाच्या प्रमाणीकरण कार्यक्रमाद्वारे ह्या गाठींपासुन (ज्या बियाणांपेक्षा वजनाने हलक्या आणि कमी दाट असतात) सुटकारा मिळविला जाऊ शकतो.
अॅन्ग्युइना ट्रीटिसी नावाच्या सूत्रकृमीमुळे ही लक्षणे उद्भवतात. छोटे सूत्रकृमी पाण्यातुन वर चढतात, कोंबातील वाढणार्या भागावर आणि फुलांवर हल्ला करतात. गहू, जव आणि राय हे मुख्य यजमान आहेत तर, ओट, मका आणि ज्वारी नाहीत. एकदा का तयार होणार्या बियात ते शिरले कि मग गाठी तयार करतात आणि त्यात रहातात आणि कात टाकुन प्रौढ होतात. संभोगानंतर माद्या बियांवरील गाठीतच अंडी घालतात. ही अंडी तिथेच सुकतात आणि पुढच्या वसंतापर्यंत सुप्तावस्थेत रहातात. ह्या बियांवरील गाठी बियांबरोबर पेरणी करताना किंवा काढणी करताना पसरतात. सूत्रकृमी जेव्हा ओल्या मातीच्या आणि पाण्याच्या संपर्कात येतात तेव्हा जीवनचक्र पुन्हा चालू होते. थंड आणि ओली हवा खास करुन ह्यांच्या विकासासाठी अनुकूल आहे.