भात

भाताच्या शेंड्या वरील ढेकुण

Tibraca limbativentris

किडा

थोडक्यात

  • कोवळे फुटवे वाळतात, खोडाचे नुकसान (मृत गाभा) आणि फुलधारणेच्या काळात ओंब्या पांढर्‍या पडतात (पळीज).

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

भात

लक्षणे

जरी हे किडे पाण्यखालच्या आणि कोरडवाहू लागवडीत पहिले जात असले तरीही कोरडवाहू लागवडीत जास्त गंभीर असतात. पिल्ले आणि प्रौढ भाताच्या कोवळ्या रोपांवर हल्ला करतात, ज्यामुळे "मृत गाभा" आणि "पळीज" अशी लक्षणे दिसतात. "मृत गाभा" म्हणजे नविन फुटव्याची पाने वाळतात आणि काही वेळा पूर्ण खोडच वाळते. अशाच प्रकारची लक्षणे डयाट्रे जातीच्या पतंगांमुळे देखील दिसतात. फुलधारणेच्या वेळी किडे ओंबीवर हल्ला करतात आणि टी. लिम्बाटीव्हेन्ट्रिस नावाचे किडे ओंबी विकसित होत असताना त्यातील पानांचा रस शोषण करतात आणि दाण्यात विष निर्माण होत असल्याने "पळीज" किंवा "पांढरी ओंबी" अशी लक्षणे दिसतात. जर नियंत्रण केले गेले नसेल आणि उद्रेक जास्त असेल तर ८०% पर्यंत नुकसान होते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

टेलेनोमसच्या प्रजाती यांच्या अंड्यांना खातात. या प्रजातींना शेतात सोडले असता काही वेळा ९०% परजीवीपणादिसुन आला आहे. इतर नैसर्गिक शत्रुत येतात एफेरिया जातीच्या काही माशा. मेटार्‍हिझियम अॅनिसोप्लिये, ब्युव्हेरिया बासियाना, पेसिलिमायसेस प्रजाती कोर्डीसेप्स न्युटान्सवर आधारीत उत्पाद वापरले जाऊ शकतात. कोनिडियाला भाताच्या रोपावर द्रावण रुपात वापरले जाऊ शकते. पायपर कुटुंबातील सर्व प्रजातीच्या अत्यावश्यक तेलांची द्रावणे देखील (०.२५ ते ४.०%) अंड्याच्या जगण्याला बाधीत करतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. इतर कोणताच उपाय उपलब्ध नसल्यास स्फुरद, पायरेथ्रॉइड किंवा अधिकृत कार्बामेट कीटनाशके वापरली जाऊ शकतात.

कशामुळे झाले

टिब्राका लिम्बाटिव्हेन्ट्रिस नावाच्या किड्यामुळे ही लक्षणे उद्भवतात. हा किडा मध्य आणि दक्षिण अमेरीकेचा रहिवासी आहे आणि भाताव्यतिरिक्त सोयाबीन, टोमॅटो आणि गव्हावरही हल्ला करतो. बहुधा हा किडा दोन पीकांमधील काळ शेताबाहेर काढतो आणि नविन पेरणी झाल्यावर परत येतो. पिल्ले आणि प्रौढ दोन्ही रोपांना खातात, ज्यामुळे पळीज आणि मृत गाभा अशी लक्षणे दिसतात. ही लक्षणे अनुक्रमे धान्याच्या आणि खोडाच्या नुकसानाशी संदर्भित आहेत. भात जर कोरड्या किंवा कमी आर्द्रतेच्या हवामानात लागवड केलेला असेल तर नुकसान जास्त होते. पाण्याच्या कमतरतेमुळे या किड्यांना रोपाच्या बुडाजवळ राहता येते. जसे पीक वयात येते, खोड घट्ट (टणक) होत जाते ज्यामुळे किडे याला सहजासहजी खाऊ शकत नाहीत आणि यांची संख्या हळुहळु कमी होत जाते.


प्रतिबंधक उपाय

  • जमिन तयार करताना पीकाचे अवशेष आणि तण काढुन टाका.
  • किडे पडिक जमिनींना प्राधान्य देत असल्याने सभोवतालची शेती व्यवस्थित हाताळली असल्याची खात्री करा.
  • लागवडीचे अंतर जास्त ठेवा (१५० रोपे प्रति एक चौ.
  • मी.) कारण जास्त घनदाटपणा त्यांना नैसर्गिक शत्रुंपासुन वाचवतो.
  • या प्रजातींच्या भक्षकांवर परिणाम न होण्याकरता कीटनाशकांचा वापर सिमीत ठेवा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा