आंबा

आंब्यावरील तुडतुडे

Idioscopus spp.

किडा

थोडक्यात

  • पाने, फुले आणि फांद्या तपकिरी होऊन सुकतात.
  • तुडतुडे मधाळ रस सोडतात.
  • तुडतुडे सोनेरी किंवा गडद तपकिरी असुन पाचरीच्या आकाराचे असतात आणि मोठे गोल डोके असुन डोळे गोलकासारखे असतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

आंबा

लक्षणे

इडियोस्कोपस प्रजातीचे प्रौढ आणि पिल्ले फांदी, फुले, कोवळी पाने आणि फळांच्या शिरातुन रसशोषण करतात. झाडाचे संक्रमित भाग तपकिरी होतात आणि कदाचित विकृत आकाराचे होऊन सुकतात. कोवळी फुले पूर्ण उमलत नाहीत ज्यामुळे फळधारणेवर आणि फळांच्या विकासावर परिणाम होतो. तुडतुडे रसशोषण करताना मधाळ रस सोडतात ज्यामुळे इतर किडे आकर्षित होऊन काळ्या बुरशीला वाढण्यासाठी उत्कृष्ट परिस्थिती निर्माण होते. बुरशीच्या वाढीने पानांच्या प्रकाशसंस्लेषणावर परिणाम होऊन झाडाचे जोम आणि उत्पादन क्षमता कमी होते. तुडतुडे पानात आणि फुलांच्या देठांवर अंडी घालत असल्याने त्या भागांचे पण नुकसान होते. तुडतुडे गंभीर उपद्रव करुन काही वेळा ५०% पर्यंत पीकाचे नुकसान करू शकतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

जैव नियंत्रके जसे कि मलाडा बोनिनेनसिस आणि क्रायसोपा लॅसिपरडा आणि अंड्याचे परजीवी पॉलिनेमाच्या प्रजातींच्या वापरामुळे तुडतुड्यांची संख्या कमी होते. अठवड्यातुन २-३ वेळा ब्युव्हेरिया बॅसियाना किंवा मेटार्हीजझियम अॅनिसोप्ली बुरशीच्या फवारण्या संक्रमित झाडांवर केल्यास प्रादुर्भाव नियंत्रणात आणता येऊ शकतो. नीम तेला (३%) वर आधारीत फवार्‍याने इडियोस्कोपस जातीच्या किड्यांची संख्या जवळजवळ ६०%नी कमी होते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. इमिडाक्लोप्रिड (०.३%), एंडोसल्फान (०.५%) आणि सायपरमेथ्रिन (०.४%) सारख्या कीटनाशकांची फवारणी अतिशय परिणामकारक सिद्ध झाली आहे. डायमेथोएटचा वापर फवारणी द्वारे किंवा खोडात इंजेक्शनाद्वारे केला जाऊ शकतो. फुलोरा येण्याच्या सुमारास सात दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या करण्याची शिफारस करण्यात येत आहे, जेणे करुन परागीकरण करणाऱ्या किडींवर विपरित परिणाम होणार नाही.

कशामुळे झाले

तुडतुड्यांचे शरीर पाचरीच्या आकाराचे असून डोके मोठे व गोल असते आणि डोळे गोलाकार असतात. प्रौढ ४-५ मि.मी. लांबीचे सोनेरी किंवा गडद तपिकिरी रंगाचे असतात. पिल्ले पिवळसर तपकिरी असुन त्यांचे डोळे लाल असतात. तुडतुडे प्रजाती अनुरूप एकेक अंडे फुलात, पानांच्या शिरांमध्ये आणि पानांत घालतात. १०० ते २०० अंडी घातली जाऊ शकतात. त्यांना सावलीच्या वातावरणाबरोबर उच्च आर्द्रता फार आवडते. प्रौढ तुडतुडे चांगले उडु शकतात आणि छोट्या अंतरावर झपाट्याने पोचतात. रोपांच्या वहनाने किडे दुसर्‍या बागेत किंवा भागात पसरु शकतात. जुन्या, दुर्लक्षित किंवा फार घनदाट बागा ह्यांची संख्या वाढण्यास अतिशय अनुकूल असतात.


प्रतिबंधक उपाय

  • लागवडीचे अंतर जास्त ठेवा.
  • तुडतुड्यांच्या प्रौढ आणि पिल्लांसाठी बागेचे नियमित निरीक्षण करा.
  • तुडतुड्यांसाठी कमी संवेदनशील असलेले वाण निवडा.
  • झाडाच्या संक्रमित भागांचे परिवहन करणे टाळा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा