आंबा

आंबा पिकावरील शेंडे पोखरणारी अळी

Apsylla cistellata

किडा

थोडक्यात

  • जिथे कळी यायला हवी तिथे टणक, हिरवी, शंकुच्या आकाराची गाठ दिसते.
  • तपकिरी काळी अंडाकृती अंडी पानांखाली असतात.
  • फांद्यांची मर होते व फुल व फळधारणा कमी होते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

आंबा

लक्षणे

वसंत ऋतुच्या काळात माद्या अंडाकृती तपकिरी काळी अंडी पानाच्या खालच्या बाजुला किंवा मध्यशिरेत घालतात. सुमारे २०० दिवसांनी अळ्या बाहेर येतात आणि जवळच्या कळीवर रांगत जाऊन त्यांना खातात. किडीने आपली सोंड टोचते वेळेस आणि रसशोषण करते वेळेस काही रसायने झाडात सोडल्याने कठिण गडद हिरव्या रंगाची शंकुसारखी गाठ कळीच्या जागी निर्माण होते. ह्यामुळे फुलोरा योग्य होत नाही आणि फळलधारणा खूप कमी होते. प्रादुर्भाव जास्त झाल्यास फांदी मर होऊ शकते. नुकसान किती अंडी घातली गेलीत आणि त्यांचा फुलांवर झालेला परिणाम ह्यावर अवलंबुन असते. अॅपसिल्ला सिस्टेलाटा ही भारत आणि बांगला देशातील आंबा पिकांवरील गंभीर समस्या आहे.

शिफारशी

जैविक नियंत्रण

औद्योगिक राख जी सिलिकेटनी भरपूर असेल तिच्या वापराची शिफारस करण्यात येत आहे. बाधीत फांद्या आणि कोंब लागण झालेल्या टोकापासुन आणखी १५-३० सें.मी. पर्यंत छाटावेत ज्यामुळे गाठींची संख्या कमी होईल.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. सालींवर डायमिथोएटचा पेस्ट (०.०३%) लावा ज्यामुळे झाडावर वरखाली फिरणार्‍या सिलिडचा नायनाट होईल. डायमिथोएटचे इंजेक्शन सालीत दिल्यानेही चांगले नियंत्रण मिळते. सिलिड लागणीच्या सुरवातीला ह्या कीटनाशकांची फवारणी केली असताही चांगले परिणाम मिळतात.

कशामुळे झाले

प्रौड ३-४ मि.मी. लांब असतात आणि डोके आणि छातीचा भाग तपकिरीसर काळा असतो व ओटीपोट फिकट तपकिरी असते आणि पंख विविध पडद्यांचे बनलेले असतात. ते पानाच्या मध्यशिरांच्या दोन्ही बाजुला टोचुन किंवा पानाच्या पृष्ठभागावर एका ओळीत टोचुन आत अंडी घालतात. अंडी २०० दिवसांनी उबतात आणि पिवळसर अळ्या बाहेर येतात. बाहेर येताच त्या जवळच्या कळीवर रांगत जाऊन रसशोषण करतात. रसशोषण करते वेळेस जे रसायन ते झाडांमध्ये सोडतात त्यामुळे हिरव्या शंकुसारख्या आकाराच्या गाठी तिथे तयार होतात. इथे अळ्यांचा प्रौढ होण्याआधीचा सहा महिन्यांचा जीवनक्रम सुरु होतो. कोषातुन बाहेर आलेले प्रौढ गाठीतुन खाली जमिनीवर पडतात जिथे ते कात टाकतात. नंतर ते संभोगासाठी आणि अंडी घालण्यासाठी झाडांवर जातात.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास ह्या किडीस प्रतिरोधक वाण निवडा.
  • बागेत नियमितपणे सिलिडच्या संसर्गासाठी बागेवर लक्ष ठेवा.
  • खताचा जास्त वापर टाळा.
  • दुष्काळाचा ताण टाळण्यासाठी कोरड्या हवामानात बागेला नियमितपणे पाणी द्या.

प्लँटिक्स डाऊनलोड करा