कापूस

खताच्या जास्त प्रमाणामुळे पाने करपणे

Fertilizer Burn

इतर

थोडक्यात

  • पानांच्या कडा तपकिरी होतात किंवा पाने करपतात.
  • पाने पिवळी पडतात, झाड मरगळते आणि वाढ खुंटते.

मध्ये देखील मिळू शकते

3 पिके

कापूस

लक्षणे

नुकसान बहुधा पानांच्या कडा तपकिरी होणे किंवा पाने करपण्यातुन दिसुन येते. खतातील विरघळणारे क्षार मुळांतुन पाणी शोषतात ज्यामुळे पाने पिवळी पडतात झाड मरगळते आणि वाढ खुंटते. पाने भाजणे किंवा करपणेसुद्धा काही खते पानांच्या थेट संपर्कात आल्याने होऊ शकते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

खतांमुळे करपण्यासाठी कोणतेही जैव उपचार उपलब्ध नाहीत.

रासायनिक नियंत्रण

खतांमुळे करपण्यावर कोणतेही रसायनिक नियंत्रण उपचार उपलब्ध नाहीत.

कशामुळे झाले

खते जास्त दिल्याने लक्षणे उद्भवतात. जमिनीचा प्रकार, सिंचन पद्धत, क्षार पातळी आणि ठराविक झाडांची संवेदनशीलतेप्रमाणे नुकसान दिसुन येते. ऊष्ण कोरड्या वातावरणात भाजीपाल्याच्या झाडांना जास्त खते दिल्यास गंभीर नुकसान होते. खतातील क्षार हे दुष्काळ सदृष्य परिस्थितीत जमिनीत जास्त केंद्रित होते. यामुळे मुळांना थेट इजा होते, ज्यातुन झाडाच्या वरच्या भागातील पाने करपतात. तसेच, विरघळणारे क्षार झाडातुन पाण्याचे चलन शोधत असल्याने पानांत केंद्रित होतात जिथे उष्मायन किंवा बाष्पीभवनाद्वारे गरम, कोरड्या दिवसात ओलाव्याचे प्रमाण जलद गतीने कमी होते. थंड आणि ढगाळ हवामानात, जेव्हा जमिनीचा ओलावा पुरेसा असतो तेव्हा पानांची आर्द्रता कमी होण्याचा दर मंद असतो, ज्यामुळे बऱ्याच झाडांना वसंत ऋतूमध्ये उच्च क्षारच्या पातळीस सहन करण्याची मुभा मिळते, परंतु उन्हाळ्याच्या महिन्यांत ते शक्य होत नाही. म्हणून, हवामान कोरडे असताना दाणेदार खतांचा वापर न करणे आणि झाडाच्या करपण्यावर आळा घालण्यासाठी वापरल्यानंतर लगेच पाणी द्यावे अशी शिफारस करण्यात येते.


प्रतिबंधक उपाय

  • खतांमुळे करपण्याचा प्रतिबंध हळुवारपणे पोषके सोडणारी सेंद्रिय खते वापरुन करता येतो.
  • दर वर्षी काही थोड्या प्रमाणत शेणखत (कंपोस्ट) टाकल्यास देखील मदत मिळते.
  • दाणेदार खते टाकल्यानंतर पानावर पडलेले खताचे कण पुसून टाका.
  • लेबलच्या निर्देशांनुसार पाण्यात विरघळणाऱ्या पानासाठीच्या खतांचा वापर करा.
  • हवामान जेव्हा फारच कोरडे असते तेव्हा दाणेदार खतांचा वापर करु नका तसेच, वापरानंतर रोपे करपू नयेत म्हणुन नंतर ताबडतोब पाणी देण्याची काळजी घ्या.

प्लँटिक्स डाऊनलोड करा