आंबा

पानावरील शेवाळ ठिपके

Cephaleuros virescens

इतर

थोडक्यात

  • पानांवर केसाळ, हिरवे ते नारिंगी ठिपके येतात.
  • कोवळ्या फांद्यांच्या सालीवर भेगा पडतात.
  • पानगळ होते.
  • फळे रंगहीन होतात.
  • जमिनीजवळच्या फांद्यांना वाढीवरीत्या संक्रमण होते.

मध्ये देखील मिळू शकते

4 पिके

आंबा

लक्षणे

परजीवी शेवाळ सी. व्हिरेसेन्स मुख्यत: आंबा आणि इतर यजमानांच्या पानांना प्रभावित करते पण फांद्या आणि खोडाला देखील लक्ष्य करू शकते. संक्रमित पानांवर गोल, थोडे उंचवटलेले, २-४ मि.मी. व्यासाचे हिरवे ते नारिंगी ठिपके येतात. या ठिपक्यांचे वैशिष्ट्य केसाळ वाढ (शेवाळचे बीजाणू) आणि पुसट कडा आहे. ते एकमेकात मिसळुन मोठे भाग व्यापतात. सी. व्हिरेसेन्स जंतुला संवेदनशील असलेल्या कोवळ्या खोडाच्या सालीला भेगा पडु शकतात ज्यामुळे मर होते. पुष्कळशा झाडांवर जमिनीजवळ वाढणार्‍या फांद्यांच्या पानांवरील लक्षणेच फार खराब असतात. पानावरील शेवाळ ठिपके सामान्यपणे उच्च तापमान आणि पाऊस असलेल्या भागात आणि नीट वाढ न होणार्‍या झाडात येतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

जेव्हा रोग सौम्य असतो तेव्हाच रोगट फांद्या तसेच ठिपके आलेली पाने काढुन नष्ट करा. तसेच जमिनीवर पडलेली संक्रमित पाने मातीतुन काढुन नष्ट करा. जर पानांवरील शेवाळ ठिपके गंभीर असतील तर बोर्डो मिश्रण किंवा इतर कॉपरवर आधारीत उत्पादांची फवारणी करा. फवारणी उन्हाळ्याच्या सुरवातीपासुन शरद ऋतु संपेपर्यंत दर दोन अठवड्यांनी केली गेली पाहिजे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. रसायनिक नियंत्रणाची गरज भासलीच तर कॉपर असणार्‍या बुरशीनाशकांच्या फवारण्या कराव्यात.

कशामुळे झाले

पानावरील शेवाळ ठिपके सामान्यपणे उच्च तापमान आणि पाऊस असलेल्या भागात जिथे यजमान झाडांची वाढ व्यवस्तीत होत नसेल तिथे येतात. कमी पोषण, पाण्याचे योग्य निचरा नसणाऱ्या जमिनी आणि खूप कमी किंवा खूप जास्त प्रमाणात सावली या रोगासाठी अनुकूल अशी स्थिती निर्माण करतात. बीजाणुंना उगवण्यासाठी पाणी लागते. त्यांचा प्रसार उडणार्‍या पावसाच्या पाण्याने किंवा वार्‍याने इतर झाडांवर होतो. सी. व्हिरेसेन्स त्याच्या यजमानाचे पाणी आणि खनिज क्षार घेतात म्हणुन याचे वैशिष्ट्यपूर्ण नाव आहे 'पाण्यातील परजीवी'. शेवाळची वाढ पानांना ती गळेपर्यंत पूर्ण ग्रासते. नविनच वरवर तयार झालेल्या वस्त्या वारंवार पावसाने वाहुन जातात. जे बीजाणू पानांच्या जखमेतुन आत शिरतात तेच फक्त ठिपके निर्माण करतात. जखमा नसलेल्या सालीतुन आत शिरकाव झाल्याचा काही पुरावा नाही.


प्रतिबंधक उपाय

  • लागवड एका रेषेत योग्य रीतीने करुन हवा चांगली खेळती राहील याची काळजी घ्या.
  • रोपा॒चा ताण कमी करण्यासाठी लागवड परिस्थितीत सुधारणा करा.
  • पाण्याचा चांगला निचरा करुन पाणथळीची परिस्थिती टाळा.
  • झाडी लवकर वाळण्यासाठी सिंचन सकाळी लवकर करा.
  • तुषार सिंचन शक्यतो टाळा.
  • जर झाडाची वाढ व्यवस्थित होत नसेल तर खनिज खते वापरा.
  • पोटॅशियम फॉस्फेट असणाऱ्या उत्पादांची फवारणी करा.
  • पान आणि फळ लवकर वाळण्यासाठी झाडीतुन चांगली हवा खेळती रहाण्यासाठी झाडांची दाटी योग्य ठेवा.
  • लागवड एका रेषेत योग्य रीतीने करुन हवा चांगली खेळती राहील याची काळजी घ्या.
  • झाडाच्या आजुबाजुचे तण काढुन टाका म्हणजे पोषके आणि आर्द्रतेसाठी स्पर्धा रहाणार नाही.
  • बागेत काम करताना झाडांना इजा होऊ नये याची काळजी घ्या.

प्लँटिक्स डाऊनलोड करा