टोमॅटो

सूत्रकृमी

Nematoda

इतर

थोडक्यात

  • वाढ खुंटते.
  • पान पिवळी पडतात आणि मरगळतात.
  • मुळांवर गाठी उठतात.
  • मूळ प्रणाली खराब होते.
  • फांद्यांवरही प्रभाव पडु शकतो.

मध्ये देखील मिळू शकते

42 पिके

टोमॅटो

लक्षणे

ठराविक प्रजाती, त्यांची संख्या आणि यजमान झाड याप्रमाणे सूत्रकृमीचे संक्रमण नुकसानाचे विविध प्रकार दर्शविते. काही सुत्रकृमी त्यांच्या यजमान झाडाची मुळधारणा वाढवितात ज्यामुळे गाठी किंवा गळवांसारखी रचना तयार होते. इतरात मुळांवर खूप जास्त व्रण येतात आणि मुळांच्या आतील भाग खराब होऊ लागतो. पाणी आणि पोषके झाडाच्या वरच्या भागात पोचत नाहीत. बहुतेक वेळा बुरशी किंवा जमिनीतील जिवाणू या व्रणांवर दुय्यम हल्ला करतात. संक्रमित झाडांची वाढ खुंटलेली असते आणि त्यांची पाने पिवळी पडुन मरगळण्याची आणि विकृतीची लक्षणे देखील दिसतात. काही वेळा फांद्या देखील प्रभावित होतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

काही वेळा, जैविक नियंत्रक घटकही वापरले जाऊ शकतात. नेमॅटोफोरा गायनोफिला आणि व्हर्टिसिलियम क्लामायडोस्पोरियम बुरशींचा संबंध धान्यांवरील काही कृमींची संख्या कमी करण्यासाठी आणि/किंवा त्यांना दडपुन टाकण्याशी, लावला गेला आहे. झेंडू (टागेटेस पॅच्युला) आणि (कॅलेन्ड्युला ऑफिशिनालिस) च्या अर्काचा वापर जमिनीत केल्यास काही प्रमाणात लोकसंख्या कमी होते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. सुत्रकृमी कोणत्या प्रकारचा आहे यावर उपचार अवलंबुन आहेत. सुत्रकृमीनाशकांचा (डॅझोमेट) वापर जमिनीत धूरी देण्यासाठी केल्यास त्यांची संख्या कमी करण्यात परिणामकारक आहेत पण बरेच शेतकर्‍यांना परवडणारे नाहीत. यातील काही उत्पाद फवारणीच्या रुपात देखील वापरले जाऊ शकतात.

कशामुळे झाले

सुत्रकृमी हे अतिसूक्ष्म गोल किडे आहे जे बहुधा जमिनीत रहातात आणि तिथुन ते यजमान झाडाच्या मुळांना संक्रमित करतात. सामान्यपणे हे मित्र किडे आहेत तरीही, जेव्हा त्यांची लोकसंख्या चिंताजनक होते तेव्हा ते झाडाला नुकसान करतात. सुत्रकृमी आपली सोंड मुळात आणि झाडाच्या जमिनीखालील भागात खुपसतात आणि काही वेळा पान आणि फुलातही खुपसतात. सूत्रकृमीची खाण्याची वेगवेगळी पद्धत आहे आणि खूप वर्षांपर्यंत जमिनीत राहू शकतात. त्यांचे प्रजोत्पादन आंतर यजमानांद्वारे होते. सुत्रकृमी इतर रोगांचे जिवाणू, विषाणू किंवा बुरशीचेही वहन करतात.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास प्रतिकारक किंवा सहनशील वाण वापरा.
  • झेंडू किंवा कॅलेन्डुला किंवा फुलांच्या ओळी पिकांमधुन लावल्यासही संख्या कमी होते.
  • बऱ्याच अठवड्यांसाठी जमिनीवर प्लास्टिकचे आच्छादन पसरा.
  • शेत नांगरुन जमिनीला तापू द्या.
  • जास्त संक्रमण झाल्यास बऱ्याच महिन्यांसाठी जमिन पडिक ठेवण्याचा विचार करा.
  • बर्‍याच वर्षांसाठी वेगवेगळ्या पिकांबरोबर पीक फेरपालट करण्याचा विचार करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा