Gastropoda
इतर
गोगलगायींचा उपद्रव खूप प्रसृत आहे आणि जर त्यांची लोकसंख्या जास्त झाली तर पिकाचा गंभीर नाश होऊ शकतो. त्या अनियमितपणे खातात आणि पानांत मोठे छिद्र सोडतात पण फांद्या, फुले, कंदांनाही प्रभावित करतात. बटाट्याच्या पिकात त्या बटाटे कंदांच्या सालींवर गोल उथळ छिद्रे करतात किंवा आतपर्यंत पोखरुन बोगदे करतात, ज्यामुळे खूप नुकसान होते. नुकसानीचा मागोवा त्यांनी पानांवर आणि जमिनीच्या पृष्ठभागावर मागे सोडलेल्या रुपेरी चिकट मागामुळे घेता येतो. त्या बहुधा आर्द्र हवामानात अवतरतात आणि त्यांचे लक्ष खास करुन कोवळ्या रोपांवर असते आणि कोवळ्या रोपांना पूर्णपणे खाऊन मोठे नुकसान करू शकतात.
फेरिक फॉस्फेटवर आधारीत गोळ्या देखील सेंद्रिय शेती करणार्यांच्या वापरासाठी मान्य आहेत. हेजहॉग्ज, पक्षी, बेडुक, ब्लाइंडवर्मस आणि जमिनीवरील भुंगे सारखे भक्षकही शेतातील उपद्रवाच्या उपस्थितीस आळा घालू शकतात.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. गोगलगायची भिन्नता आणि जीवनचक्रामुळे, रसायनिक नियंत्रणाच्या टप्प्यात ते येत नाहीत. मेटालडिहाइडवर आधारीत गोळ्या वापरुन त्यांना त्यांच्या बिळाबाहेर प्रलोभित करता येते. ह्या गोळ्या पावसानंतर पसरा जेव्हा गोगलगाई सर्वात जास्त कार्यरत असतात.
गोगलगाय कुजत असलेल्या सेंद्रिय घटकांना आणि बरेचशा पिकांचे पान, मूळ आणि कंद खातात. गोगलगाय जमिनीखालचे रहिवाशी आहेत, खोड किंवा जंतुनी केलेल्या भेगा आणि बोगदे वापरुन त्या पसरतात. जमिनीवर त्या फक्त संभोगासाठीच येतात. बटाट्याच्या सालीवर त्या गोल उथळ छिद्रे करतात किंवा कंदात खोल पोखरतात, ज्यामुळे मोठा नुकसान होतो. हे प्राणी ओल्या हवामानात फोफावतात म्हणुन दव पडलेल्या रात्री किंवा पावसानंतर संक्रमण जास्त होते. बहुतेक प्रजाती थोडी थंडी सहन करु शकतात आणि वसंत ऋतुत पुन्हा सक्रिय होतात.