सोयाबीन

जस्तची कमतरता

Zinc Deficiency

कमतरता

थोडक्यात

  • कडांपासून सुरुवात होऊन पाने पिवळी पडतात.
  • मुख्य शिरा मात्र हिरव्याच राहतात.
  • प्रभावित पाने फांदीच्या सभोवताली एकत्र होतात.
  • वाढ खुंटते.

मध्ये देखील मिळू शकते


सोयाबीन

लक्षणे

प्रजातीप्रमाणे जस्तच्या कमतरतेची लक्षणे बदलतात पण बरेचसे प्रभाव सारखेच असतात. बऱ्याच प्रजातीत पाने पिवळी पडणे, बहुधा पानातील मुख्य शिरा हिरव्याच रहातात. काही प्रजातीत, कोवळी पाने जास्त प्रभावित होतात पण इतरांत जुनी आणि नवी दोन्ही पाने लक्षणे दर्शवितात. नविन पाने बहुधा बारीक आणि अरुंद असुन त्यांच्या कडा नागमोडी असतात. कालांतराने पिवळे डाग तांबुस होतात आणि वाळलेले (करपट) डाग कडांपासुन येतात. काही पिकात, जस्तच्या कमतरतेत पानाचे देठ शक्यतो लहान असतात म्हणुन फांदीवर पाने (झुडपासारखी) गोळा होतात. नविन पानाचा विकास प्रतिबंधित झाल्याने (खुजी पाने) आणि देठाची लांबी कमी झाल्याने पानाची विकृती आणि देठांची वाढ देखील कमी होऊ शकते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

लागवड केल्यानंतर काही दिवसांनी गादीवाफ्यात किंवा शेतात सेंद्रिय खतांचा वापर केल्याने जस्तच्या कमतरतेची संभावना कमी करता येते.

रासायनिक नियंत्रण

झिंक सल्फेट असणार्‍या उत्पादांना रोपवाटीकेतील गादीवाफ्यांवर पसरले जाऊ शकते. लक्षणे लक्षात आल्यानंतर झिंक सल्फेटच्या ०.२-०.५%, अठवड्याच्या अंतराने (३ फवारण्या) फवारण्या केल्या जाऊ शकतात. जमिनीच्या प्रकार आणि सामूवर आणि पानांतील जस्ताच्या मूळ केंद्रीकरणाप्रमाणे वापराच्या दराची शिफारस केली जाऊ शकते. वर सांगीतलेल्या मापदंडांप्रमाणे जमिनीवरील वापर खूप बदलु शकतो पण शक्यतो ते ५ ते १० किलो जस्त प्रति हेक्टर श्रेणीत असतात. उच्च खताच्या प्रमाणाने जस्तची विषासक्तता होऊ शकते त्यामुळे त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. जस्तची बीज प्रक्रिया करणे हा, हे सूक्ष्म अन्नद्रव्य झाडांना उपलब्ध करण्याचा अजुन एक मार्ग आहे किंवा बियाणे किंवा रोप २-४% झिंक ऑक्साईड द्रावणात बुडवून पेरणी किंवा लागवड करावी.

कशामुळे झाले

अल्कधर्मी वालुकामय (उच्च सामू असलेल्या) जमिनी जिथे सेंद्रिय घटक कमी असतात तिथे जस्तची कमतरता ही समस्या असते. जमिनीत स्फुरद आणि कॅल्शियमची पातळी जास्त असलेल्या (कॅल्सरस जमिनी) ठिकाणी देखील झाडांना जस्त उपलब्ध होत नाही. खर तर स्फुरदाच्या वापरामुळे जस्ताच्या शोषणावर विपरित परिणाम दिसु शकतो. चुनखडी किंवा खडू (लाईमिंग)सारखी कॅल्शियमने भरपूर असलेली सामग्री दिल्यासही जमिनीतील आम्लाची पातळी वाढते आणि (जरी जमिनीतील जस्ताची पातळी बदललेली नसली तरी) झाडांना जस्तचे शोषण बरोबर करता येत नाही. जिथे झाडी वाढीच्या काळात जमिनी थंड आणि ओल्या असतात तिथेही जस्तच्या कमतरतेची समस्या होऊ शकते.


प्रतिबंधक उपाय

  • पेरणी किंवा लागवड करण्यापूर्वी सेंद्रिय खत द्या.
  • सहनशील किंवा जमिनीतून जस्तचे चांगले शोषण करणारे वाण लावा.
  • जमिनीत चुनखडी वापरू नका कारण यामुळे सामू वाढेल आणि जस्तच्या शोषणात अडथळा निर्माण होईल.
  • जस्त मिश्रणे असलेली खते वापरा.
  • अमोनियम सल्फेटवर आधारीत खतांपेक्षा युरियावर आधारीत खते (जी आम्लता तयार करतात) वापरा.
  • सिंचनाच्या पाण्याची प्रत नियमितपणे तपासा.
  • स्फुरदयुक्त खते जास्त देऊ नका.
  • कायम पाणी भरलेली शेते अधुनमधुन पाणी काढुन कोरडी होऊ द्या.

प्लँटिक्स डाऊनलोड करा