कापूस

गंधकाची कमतरता

Sulfur Deficiency

कमतरता

थोडक्यात

  • नविन येणारी पाने आकाराने लहान आणि पिवळ्या टोकांची असतात.
  • तपकिरी डागांच्या ओळी टोकापासुन सुरु होऊन शीरांच्या समांतर येतात.
  • झाड रोगांना (उदा.
  • खोड कूज) जास्त संवेदनशील होतात.
  • नत्राच्या कमतरतेपासुन गंधकच्या कमतरतेला वेगळे काढण्यासाठी हे लक्षात घ्या कि गंधकच्या कमतरतेत वरची पाने प्रभावित होतात तर नत्राच्या कमतरतेत जुन्या पानांवर पहिल्यांदा लक्षणे दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

58 पिके
बदाम
सफरचंद
जर्दाळू
केळी
अधिक

कापूस

लक्षणे

गंधकची कमतरता असलेली पाने पहिल्यांदा फिकट हिरवी आणि नंतर पिवळसर हिरवी ते पूर्ण पिवळी होतात आणि फांद्यांवर देखील शक्यतो जांभळट छटा दिसते. ही वैशिष्ट्ये नत्र कमतरतेसारखीच असतात आणि सहजगत्या गल्लत होऊ शकते. तरीपण, गंधकच्या कमतरेची पहिली लक्षणे वरच्या नविन पानांवर पाहिली जाऊ शकतात. काही पिकात या ऐवजी शिरांमधील पिवळेपणा किंवा पानांच्या पात्यावर ठिपके (गहू आणि बटाटे) दिसु शकतात. पाने शक्यतो आकाराने लहान आणि अरुंद असतात आणि त्यांचे टोक करपट असु शकतात. शेताचा प्रभावित भाग फिकट हिरवा किंवा ठळक पिवळा असा दूरवरुन देखील नजरेस पडतो. फांद्या सडपातळ होतात आणि लांबीलाही कमी भरतात. जर हंगामात कमतरता लवकर सुरु झाली तर झाडाची वाढ खुंटते, फुले येण्यात बाधा येते आणि फळे/धान्याची परिपक्वता लांबलेली असते. गंधक कमी असणाऱ्या जमिनीत लागवडीनंतर रोपांचा नेहमीपेक्षा मृत्युदर जास्त असु शकतो.

शिफारशी

जैविक नियंत्रण

शेणखत आणि पाने किंवा झाडाचा पालापाचोळा हे कंपोस्टचे मिश्रण झाडांना सेंद्रिय घटक आणि गंधक तसेच बोरॉनसारखी पोषके पुरविते. गंधक कमतरता दूर करण्यासाठी हा दीर्घकालीन दृष्टिकोन आहे.

रासायनिक नियंत्रण

  • गंधकयुक्त (एस) खते वापरा.
  • उदा.: सल्फर ९०% डब्ल्युडीजी फवारणीसाठी वापरावे
  • आपली जमीन आणि पिकासाठी सर्वोत्तम उत्पादन आणि प्रमाण जाणून घेण्यासाठी आपल्या कृषी सल्लागाराचा सल्ला घ्या.

पुढील शिफारशी:

  • आपल्या पिकाचे इष्टतम उत्पादन मिळविण्यासाठी लागवडीचा हंगाम सुरु होण्यापूर्वी माती परीक्षण करण्याची शिफारस करण्यात येते.
  • लागवडीपूर्वी गंधक देणे उत्तम असते.
  • जर आपल्या जमिनीचा सामू खूप जास्त असेल तर गंधक शोषण्यात मदत करण्यासाठी सिट्रिक अॅसिडचा वापर करा.

कशामुळे झाले

निसर्गात किंवा शेतीत देखील गंधकाची कमतरता तशी खास सामान्य नाही. गंधक मातीत चलित रुपात असतो आणि पाण्याच्या हालचालीबरोबर सहज वाहुन जाऊ शकतो. यावरुनच कळते कि सेंद्रिय घटक कमी असलेल्या, वालुकामय किंवा उच्च सामू असणार्‍या जमिनीशी कमतरता का जुडलेली असते. जमिनीतील गंधकचा बहुतेक साठा हा जमिनीतील सेंद्रिय घटकात किंवा मातीच्या कणांना चिकटलेला असतो. मातीतील जिवाणू खनिजीकरणाच्या प्रक्रियेतुन झाडाला गंधक उपलब्ध करुन देतात. या प्रक्रियेला उच्च तापमान मानवते कारण या सूक्ष्म जंतुंची सक्रियता या काळात जास्त असते आणि त्यांची संख्या देखील वाढलेली असते. गंधक झाडात चलित रुपात नसते आणि सहजपणे जुन्या पानांपासुन नविन पानांपर्यंत पोचत नाही, म्हणुनच कमतरता प्रथमत: कोवळ्या पानांवर दिसते.


प्रतिबंधक उपाय

  • खतांद्वारे गंधक रोपवाटिकेतील गादीवाफ्यांवर वापरा.
  • गवत पूर्ण उपटण्यापेक्षा किंवा जाळण्यापेक्षा जमिनीत मिसळा.
  • काढणीनंतर कोरडी नांगरण करून गंधकाचे शोषण वाढवुन जमिन व्यवस्थापन चांगले करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा