भात

मँगनीजची कमतरता

Manganese Deficiency

कमतरता

थोडक्यात

  • नविन पानांच्या दोन शिरांमधील भागात फिकट हिरवे ते पिवळे भाग तयार होतात व कालांतराने ह्या भागांवर करपट व्रण दिसायला लागतात.
  • जर वेळीच सुधारणा केली नाही तर तपकिरी करपट ठिपके पानांवर येतात आणि गंभीरपणे प्रभावित पाने पूर्ण करपून गळून जातात.

मध्ये देखील मिळू शकते

59 पिके
बदाम
सफरचंद
जर्दाळू
केळी
अधिक

भात

लक्षणे

इतर पोषक कमतरतेपेक्षा ह्याची लक्षणे जास्त लक्षणीय नसतात आणि कोणते पीक लावलेय ह्यावर जास्त करुन अवलंबुन असतात. मँगनिजची कमतरता असलेल्या झाडाच्या मधल्या आणि वरच्या (नव्या) पानांच्या शिरा हिरव्या रहातात पण बाकीचे पान पहिल्यांदा फिकट हिरवे होते आणि नंतर त्यावर फिकट हिरवे ते पिवळे ठिपकेदार भाग तयार होतात (शिरांमधील पिवळेपणा). काही काळानंतर, लहान करपट डाग खासकरुन पानांच्या कडेला आणि टोकाला ह्या पिवळ्या भागात विकसित होतात. पानांचा आकार लहान होणे व पानांच्या कडा विकृत होणे किंवा गोळा होणे होणे हे ही मँगनिजच्या कमतरतेच्या इतर लक्षणात येते. जर वेळीच उपाय योजना केल्या गेल्या नाही तर हे करपट ठिपके संपूर्ण पानभर व्यापून प्रभावित पाने तपकिरी होऊन मरगळतात. ह्या लक्षणांची मॅग्नेशियम कमरतेच्या लक्षणांबरोबर गल्लत करु नये, ज्याची लक्षणे सारखीच आहेत पण पहिल्यांदा जुन्या पानांवर दिसतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

शेणखत, जैव पालापाचोळा किंवा कंपोस्ट वापरुन पोषक तत्वे आणि जमिनीचा सामू संतुलित ठेवा. ह्यात सेंद्रीय सामग्री असल्याने जमिनीतील सेंद्रीय कर्ब वाढून बर्‍याच पोषक तत्वांची मात्रा व पाणी राखण्याची क्षमता वाढते आणि सामू थोडा कमी करते.

रासायनिक नियंत्रण

  • मँगनीज (एमएन) असणारी खते वापरा.
  • उदा.: सामान्यपणे मँगनीज सल्फेट (एमएन ३०.५%) हे जमिनीतून देण्यासाठी आणि फवारणीसाठी देखील वापरले जाते.
  • आपली जमीन आणि पिकासाठी सर्वोत्तम उत्पादन आणि प्रमाण जाणून घेण्यासाठी आपल्या कृषी सल्लागाराचा सल्ला घ्या.

पुढील शिफारशी:

  • आपल्या पिकाचे इष्टतम उत्पादन मिळविण्यासाठी लागवडीचा हंगाम सुरु होण्यापूर्वी माती परीक्षण करण्याची शिफारस करण्यात येते.

कशामुळे झाले

बहुधा वालुकामय जमिनी किंवा सेंद्रीय जमिनी ज्यांचे सामू ६ च्या वर आहे आणि उष्णकटिबंधातील जास्त धूप झालेल्या जमिनीत मँगनिज (एमएन) कमतरता ही व्यापक समस्या आहे. ह्या उलट, उच्च आम्ल असलेल्या जमिनीत ह्या पोषकाची उपलब्धता वाढलेली असते. खताच्या जास्त किंवा असंतुलित वापरानेही झाडाला उपलब्ध होण्यास सुक्ष्म अन्नद्रव्य एकमेकांशी स्पर्धा करतात. प्रकाश संश्र्लेषणात आणि नत्र शोषण्यात मँगनिजची महत्वाची भूमिका आहे. लोह, बोरॉन आणि कॅल्शियमप्रमाणेच मँगनिज रोपात अचल असते, जास्त करुन खालच्या पानात साठविले जाते. ह्यामुळेच लक्षणे पहिल्यांदा जुन्या पानांवर विकसित होतात. कडधान्य, शेंगवर्गीय पिके, कडक बिया असलेली फळपिके (चेरीसारखी), ताडाच्या जाती, लिंबूवर्गीय पिके, बीट आणि कॅनोला (तेल बियाण) ही पीके एमएन कमतरतेची उच्च संवेदनशीलता दर्शवितात आणि हे पोषक असलेल्या खतास चांगला प्रतिसाद देतात.


प्रतिबंधक उपाय

  • जमिनीचा सामू तपासा, चांगली सुपिकता येण्यासाठी गरज भासल्यास पोषक तत्वे योग्य रीतीने शोषली जातील अशी सुधारणा करा.
  • पाणी जास्त देणे टाळा व पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल ह्याची काळजी घ्या.
  • जमिनीतील आद्रता स्थिर ठेवण्यासाठी जैव पाल्यापाचोळ्याने अच्छादन करा.
  • नेहमी लक्षात ठेवा कि खताचा संतुलित वापर हा सुदृढ वाढीचा व पर्यायाने अधिक उत्पादनाचा मूलमंत्र आहे.

प्लँटिक्स डाऊनलोड करा