इतर

नत्राची कमतरता

Nitrogen Deficiency

कमतरता

थोडक्यात

  • पान आणि शिरा फिकट हिरवे होऊन रंगाचा विलोपन होतो आणि देठ लाल पडतात.
  • झाड किडकिडीत दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

58 पिके
बदाम
सफरचंद
जर्दाळू
केळी
अधिक

इतर

लक्षणे

लक्षणे पहिल्यांदा जुन्या पानांवर दिसतात आणि हळुहळु नव्या पानांवरही येतात. सौम्य संसर्गात, जुनी पाने फिकट हिरवी होतात. जर वेळीच सुधार केला नाही तर चांगलाच पसरलेला पिवळेपणा ह्या पानांवर दिसतो आणि देठ तसेच शिरा थोड्या लालसर होतात. शेतकर्‍याला खर तर देठांवरुनच पीकातील नत्रच्या कमतरतेचा पत्ता लागतो. जसजशी कमतरता वाढते तसतशी पाने (शिरांसकट) पिवळसर पांढरी होतात आणि विकृत आकाराची होतात किंवा गुंडाळी होते. नविन पाने फिकट हिरव्या रंगाची रहातात पण त्यांचा आकार नेहमीपेक्षा लहान असतो. झाडाची उंची तीच रहाते पण झाडोरा कमी असल्याने ती अजुनच उंच आणि पातळ दिसतात. झाड पाण्याच्या ताणाला संवेदनशील होतात आणि पाने सुकणे सामान्य आहे. पानगळती आणि मृत्युही ओढवु शकतो ज्यामुळे पीकाचे चांगलेच नुकसान होते. नत्र खताच्या रुपात दिले असता त्याचा परिणाम दिसायला काही दिवस जातात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

जमिनीतील सेंद्रिय बाबींच्या उच्च पातळी जमिनीचा पोत सुधारतात आणि जमिनीची पाणी आणि पोषके राखण्याची क्षमता सुधारते. जमिनीत जैव बाबी जसे खत, कंपोस्ट, पीट, किंवा फक्त नेटल स्लॅग, गुनाओ, हॉर्न मील किंवा नायट्रोलाइमही घातले जाऊ शकते. नेटल स्लॅग थेट पानांवर फवारले जाऊ शकते.

रासायनिक नियंत्रण

  • नत्रयुक्त (एन) खते वापरा.

  • उदा.: युरिया, एनपीके, अमोनियम नायट्रेट.

  • आपली जमीन आणि पिकासाठी सर्वोत्तम उत्पादन आणि प्रमाण जाणून घेण्यासाठी आपल्या कृषी सल्लागाराचा सल्ला घ्या. पुढील शिफारशी:

  • आपल्या पिकाचे इष्टतम उत्पादन मिळविण्यासाठी लागवडीचा हंगाम सुरु होण्यापूर्वी माती परीक्षण करण्याची शिफारस करण्यात येते.

  • संपूर्ण हंगामात नत्र विविध मात्रांतुन विभागुन देणे उत्तम असते.

  • काढणीची वेळ जवळ असल्यास नत्र देणे टाळावे.

कशामुळे झाले

रोपाचा झाडोरा वाढण्याच्या काळात भरपूर नत्राचा पुरवठा महत्वाचा आहे. अनुकूल हवामानात, वाढत्या रोपांना नत्राचा चांगला पुरवठा होणे महत्वाचे आहे म्हणजे त्यांचा झाडोरा चांगला वाढतो आणि फ़ल / धान्य उत्पादनाचा संभवही चांगला रहातो. नत्राची कमतरता वाळुसर, पाण्याचा चांगला निचरा होणार्‍या जमिनी ज्यात सेंद्रिय बाबी कमी असतात त्यातील पोषक तत्वे वाहुन जातात, तिथे जास्त दिसुन येते. वारंवार पडणारा पाऊस, शेतात साठणारे पाणी किंवा जास्त झालेल्या सिंचनामुळे जमिनीतील नत्र वाहुन जाते आणि रोपांना नत्राची कमतरता होते. दुष्काळाचा ताण पाण्याच्या आणि पोषकांच्या शोषणात अडथळा आणतो ज्यामुळे पोषकांचा पुरवठा असंतुलित होतो. शेवटी जमिनीचा सामूसुद्धा रोपापर्यंत नत्र पोचण्यात महत्वाची भूमिका निभावतो. जमिनीचा जास्त आणि कमी सामूही रोपाने नत्र शोषण्यावर परिणाम करतो.


प्रतिबंधक उपाय

  • आपल्या पिकाचे इष्टतम उत्पादन मिळविण्यासाठी पिकाचा हंगाम सुरु होण्यापूर्वीच जमिनीचा सामू तपासा आणि चांगली श्रेणी मिळविण्यासाठी गरज पडल्यास चुनखडीचा वापर करा.
  • शेतातील पाण्याचा चांगला निचरा होऊ द्या आणि जास्त पाणी देऊ नका.
  • खताचा वापर जास्त किंवा असंतुलित केल्यास काही सूक्ष्म पोषके रोपांना उपलब्ध होत नाहीत.
  • दुष्काळात नियमित पाणी द्या.
  • नियमितपणे जैव बाबी जसे, कंपोस्ट, खत किंवा पालापाचोळा द्या.
  • देठाचे विश्र्लेषण करविल्यानेही शेतकर्‍यांना पिकातील नत्र करमतरतेचा अंदाज येऊ शकतो.

प्लँटिक्स डाऊनलोड करा