Phosphorus Deficiency
कमतरता
स्फुरदच्या कमतरतेची लक्षणे पिकाच्या कोणत्याही काळात दिसु शकतात पण रोपावस्थेत जास्त उठुन दिसतात. इतर पोषकांच्या लक्षणांच्या विरुद्ध ह्याच्या कमतरतेची लक्षणे झटकन दिसत नाहीत म्हणुन समजायला कठिण असतात. सौम्य स्फुरद कमतरतेची लक्षणे म्हणजे झाड खुजे होणे व वाढ खुंटणे आहे तरीपण पानांवर कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. गंभीर कमतरतेत, फांद्या आणि देठावर गडद हिरवी ते जांभळी छटा दिसुन येते. जुन्या पानांच्या खालच्या बाजुलाही जांभळट छटा टोकात आणि टोकाला सुरु होऊन कालांतराने संपूर्ण पानभर व्यापते. ही पाने जाड, खरबडीत होतात आणि त्यांच्या शिरांची तपकिरी जाळी तयार होते. काही वेळा स्फुरदाच्या कमतरतेची वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे म्हणजे पानांची टोक करपणे, त्यांच्या कडा पिवळे पडणे व त्यावर करपट ठिपके येणे हे सुद्धा दिसतात. फुल आणि फळ येतात पण उत्पादनात घट होत असते.
जमिनीतील स्फुरदची पातळी शेणखत किंवा इतर बाबी (सेंद्रिय पालापाचोळा, कंपोस्ट आणि गुनाओ) किंवा ह्यांचे संयोजन करुन भरुन काढता येते. कापणीनंतर झाडांचे अवशेष जमिनीत गाडल्यानेही फार काळासाठी फॉस्फ़रसचे संतुलन चांगले राखता येईल आणि जमिनीची प्रतही चांगली वाढेल. सेंद्रिय बाबींच्या सडण्याने रोपाला उपलब्ध होण्यासारखा फॉस्फरसचा सतत पुरवठा होत रहातो.
पुढील शिफारशी:
विविध पिकात स्फुरदच्या कमतरतेची संवेदनशीलता वेगवेगळी असते. मुळे जमिनीतील पाण्यात विरघळलेले फॉस्फेटचे कण शोषतात. क्षारपट जमिनी ज्यात उच्च कॅल्शियमचे केंद्रीकरण झालेले असते तिथे स्फुरदची कमतरता असु शकते. तरीपण सामान्यपणे ह्या पोषकाची उपलब्धता झाडाला कमीच असते कारण जमिनीतील स्फुरदाचे कण मातीच्या कणांना चिकटलेले असतात ज्यामुळे ते शोषली जात नाहीत. अल्क आणि आम्ल दोन्ही प्रकारच्या जमिनीत उपलब्धता ही कमीच असते. ज्या जमिनीत सेंद्रीय पदार्थ कमी असतात किंवा लोहाचे भरपूर प्रमाण असते त्या जमिनीतही समस्या येऊ शकतात. थंड हवामान मुळांच्या योग्य विकासासाठी आणि कार्यप्रवृत्तीत अडथळा आणते त्यामुळे ते देखील या विकारास कारणीभूत होऊ शकते. दुष्काळी परिस्थिती किंवा रोग ज्यामुळे पाणी आणि पोषकांचे मुळांद्वारे शोषण करण्यात बाधा येते त्यानेही कमतरतेची लक्षणे दिसु शकतात. जमिनीतील ओलावा, याउलट, या पोषकाला शोषण्यात मदत करतो आणि परिणामस्वरुपी उत्पादनात मोठी वाढ होते.