द्राक्षे

मॅग्नेशियमची कमतरता

Magnesium Deficiency

कमतरता

थोडक्यात

  • फिकट हिरवे ठिपके किंवा पिवळेपणा पानांच्या कडेपासुन सुरवात होतो.
  • पानाच्या मुख्य शिरा मात्र हिरव्याच राहतात.
  • लालसर किंवा तपकिरी ठिपके पानावर येतात.
  • पिवळे पडलेले भाग वाळतात.
  • पाने वेडीवाकडी होतात.

मध्ये देखील मिळू शकते

59 पिके
बदाम
सफरचंद
जर्दाळू
केळी
अधिक

द्राक्षे

लक्षणे

मॅग्नेशियमची कमतरता असलेल्या झाडांच्या जुन्या पानांमध्ये सामान्यपणे फिकट हिरव्या किंवा करपट रचनेचे ठिपके दोन शिरामधील भागांवर कडेपासुन सुरवात झालेले दिसतात. कडधान्य पिकांमध्ये, सौम्य कमतरतेत देखील पानांवर समांतर ठिपके दिसतात जे वाढुन दोन शिरांमधील भाग पिवळा पाडतात. गंभीर बाबतीत पिवळेपणा पानांच्या मध्य भागापर्यंत पोहचून लहान शिरांवरही परिणाम होतो. पानांवर लालसर, किंवा तपकिरी चट्टे येतात व नंतर पिवळ्या भागात सुकलेले भाग तयार होऊन पानाला खरबडीत आणि विकृत रुप देतात. अखेरीस, पिवळेपणा संपूर्ण पानावर व्यापला जाऊन अकाली पानगळ होण्यास कारण ठरतात. मुळांची वाढ चांगली होत नाही, परिणामी झाडात जोम रहात नाही.

शिफारशी

जैविक नियंत्रण

ज्या पदार्थात मॅग्नेशियम आहे जसे कि अल्गल लाइमस्टोन, डोलोमाइट किंवा लाइमस्टोन मॅग्नेशियम वापरा. जमिनीतील पोषक सामग्री संतुलित करण्यासाठी शेणखते, जैव अच्छादन किंवा कंपोस्ट वापरा. त्यात जैव बाबी आणि बरीचशी पोषकतत्वे असतात जी हळुहळु जमिनीत मुक्त केली जातात.

रासायनिक नियंत्रण

  • मँगनेशियम (एमजी) असणारी खते वापरा.
  • उदा.: मॅग्नेशियम ऑक्साइड, मॅग्नेशियम सल्फेट (एमजीएसओ४).
  • आपली जमीन आणि पिकासाठी सर्वोत्तम उत्पादन आणि प्रमाण जाणून घेण्यासाठी आपल्या कृषी सल्लागाराचा सल्ला घ्या.

पुढील शिफारशी:

  • आपल्या पिकाचे इष्टतम उत्पादन मिळविण्यासाठी लागवडीचा हंगाम सुरु होण्यापूर्वी माती परीक्षण करण्याची शिफारस करण्यात येते.
  • मॅग्नेशियम हे जमिनीतून किंवा फवारणीद्वारे दिले जाऊ शकते.

कशामुळे झाले

हलक्या, वालुकामय किंवा आम्लयुक्त जमिनी ज्यामध्ये पोषके आणि पाणी राखण्याची क्षमता फार कमी आहे, तिथे मॅग्नेशियमची कमतरता ही एक सामान्य समस्या आहे. पोटॅशियम किंवा अमोनियमचे भरपुर प्रमाण असलेल्या जमिनी किंवा ह्या पोषकांचा अतिरेक वापरही समस्या निर्माण करु शकतो कारण ते जमिनीत मॅग्नेशियमबरोबर स्पर्धा करतात. साखरेचे वहन होण्यात मॅग्नेशियमची महत्वाची भूमिका असून हरीतद्रव्य घटकामध्ये ह्याचा महत्वाचा हिस्सा आहे. पुरेसे मॅग्नेशियम न मिळाल्यास झाडे जुन्या पानांतील हरीतद्रव्य नविन विकसित होणार्‍या पानात पाठवितात व ह्यामुळेच दोन शिरामधील भागात पिवळेपणा विकसित होतो. प्रकाशाच्या तीव्रतेमुळे लक्षणे विकसित होण्यावर प्रभाव पडतो. जास्त प्रकाशाने कमतरतेचे परिणाम जास्त वाढतात.


प्रतिबंधक उपाय

  • जमिनीचा सामू तपासा आणि सुपिक करण्यासाठी नियोजन करा.
  • पाणी जास्त देणे टाळा व पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल ह्याची काळजी घ्या.
  • पोटॅशियम युक्त खते जास्त देणे टाळा.
  • जैव पालापाचोळ्याचा वापर करा ज्याने जमिनीतील ओलावा स्थिर राहील.

प्लँटिक्स डाऊनलोड करा