Calcium Deficiency
कमतरता
लक्षणे मुख्यत: झपाट्याने वाढणार्या पेशीत जसे नविन कोंब आणि पालवीत दिसतात. नविन फांद्या नीट वाढत नाहीत आणि काही काळाने त्यांची संख्याही कमी होते. सुरवातीला नविन आणि मध्यम वयस्कर पानांच्या भागांवर कदाचित ओबड धोबडपणे पसरलेले पिवळे चट्टे दिसतात. जर दुरुस्ती केली गेली नाही तर ती खालच्या बाजुला किंवा वरच्या बाजुला गोळा होतात आणि त्यांच्या कडांवर हळु हळु करपट चट्टे निर्माण होतात. प्रौढ आणि जुन्या पानांवर बहुधा काहीही परिणाम होत नाही. मुळे नीट वाढत नाहीत आणि झाडात मरगळ दिसते आणि वाढही खुंटलेली असते. खूपच जास्त कमतरता असल्यास फुले अकाली गळतात आणि नविन फांद्यांची टोक जळाल्यासारखी दिसतात किंवा वळतात. फळे बारीक आणि खाण्यायोग्य नसतात आणि काकडी, मिरची आणि टोमॅटोच्या बाबतीत, फळांच्या बुडाला कुज विकसित होते. बियाण्याची उगवण क्षमता कमी असते.
छोट्या शेतकर्यांनी किंवा माळ्यांनी, अंड्यांच्या टरफलाची बारीक पूड करुन ती कमकुवत आम्लात (व्हिनेगर) मिसळुन वापरावी. किंवा, कॅल्शियम-समृध्द पदार्थ जसे की शेवाळ चुनखडी, बासाल्ट पूड, जाळलेला चुना, डोलोमाइट, जिप्सम आणि स्लॅग लाइमचा वापर करावा. जमिनीत ओलावा राखण्याची क्षमता वाढविण्यासाठी जमिनीत सेंद्रीय पदार्थ टाका उदा. खत किंवा जैव पालापाचोळा किंवा कंपोस्ट.
पुढील शिफारशी:
जमिनीत कमी पुरवठा आहे ह्यापेक्षा झाडाला ह्या पोषकाची उपलब्धता कमी आहे ह्याच्याशी ही लक्षणे सामान्यपणे संबंधित असतात. झाडांमध्ये कॅल्शियमचे प्रवाह गतीशील नसल्याने त्यांचे शोषण झाडातील पाण्याचे ग्रहण आणि वाहुतुकीशी घट्टपणे जोडले गेलेला आहे. ह्याच्यावरुन लक्षात येत कि नवी पानेच पहिल्यांदा कमतरतेची लक्षणे का दाखवितात. सुपिक जमिनी आणि सिंचन केलेल्या जमिनी ह्या कॅल्शियम चांगले विरघळवतात आणि झाडापर्यंत पोहचवितात. तरीपण, वालुकामय जमिनी ज्यात पाणी धरुन ठेवण्याची क्षमता कमी असते, त्या लवकर दुष्काळाला बळी पडतात आणि त्यामुळे झाडापर्यंत पोषण कमी पोचते. जर दोन पाणी देण्यातील अंतरात जमिन फारच कोरडी होत असेल तर तेही लक्षणे दिसण्याचे कारण असु शकते. ज्या जमिनीत कमी सामू, उच्च क्षार किंवा जास्त अमोनियम असणार्या जमिनी समस्या निर्माण करु शकतात. हवेतील उच्च आद्रता किंवा जमिनीवर खूप पाणी साचणे ह्यामुळे सुद्धा झाडांच्या पेशींपर्यंत पाणी हळु पोचते, ज्यामुळे कॅल्शियम कमी शोषले जाते.