Potassium Deficiency
कमतरता
लक्षणे मुख्यत्वे जुन्या पानांवर दिसतात पण खूपच जास्त कमतरता भासल्यास नवीन पानांवर सुद्धा विकसित होण्यास सुरवात होतात. सौम्य पालाश कमतरतेचे वैशिष्ट्य म्हणजे पानांच्या कडा आणि टोकांमध्ये फिकट पिवळेपणा येऊन कालांतराने हे टोक करपतात. पानांच्या कडा काहीशा फिकट होतात पण मुख्य शिरा मात्र (शिरांमधील पिवळेपणा) हिरव्याच रहातात. जर वेळीच सुधारणा केली नाही तर हे पिवळे चट्टे कोरडे, जाड व खरखरीत किंवा गडद तपकिरी करपल्यासारखे होतात जे बहुधा पानांच्या कडेपासुन सुरु होऊन पानाच्या मध्याकडे पसरतात. तरीपण मुख्य शिरा मात्र हिरव्याच रहातात. पाने गोळा होतात आणि मुडपतात आणि अकालीच गळतात. नवी पाने लहान, निस्तेज, खोलगट वाट्यांसारखी दिसतात. पालाशाची कमतरता असलेल्या झाडांची वाढ खुंटते आणि रोग व दुष्काळ आणि दंव यांसारख्या अन्य तणावांसाठी अधिक संवेदनाक्षम बनतात. काही वेळा फळे खूपच बेढब आकाराची होतात.
वर्षातून एकदा तरी, जमिनीमध्ये, राख आणि पालापाचोळ्यासारख्या सेंद्रिय पदार्थांचा वापर करावा. लाकडाच्या राखेतही मोठ्या प्रमाणावर पालाश असते. आम्ल जमिनीत चुनकळी मिसळल्यावरही काही जमिनींमध्ये पालाशाचे वाहून जाणे कमी होऊन त्याचे टिकून राहण्याचे प्रमाण वाढते.
पुढील शिफारशी:
जमिनीत पालाशाची कमी साठवण किंवा झाडांना मर्यादित उपलब्धता असल्याने पालाशाची कमतरता दिसुन येते. कमी सामू आणि वालुकामय किंवा हलकी जमिन व ज्यात कमी सेंद्रिय घटक आहेत ती दुष्काळास आणि त्यातली पोषक तत्वे वाहून जाण्यास धार्जिणी असते आणि त्यामुळेच समस्या उद्भवु शकतात. जास्त पाणी दिल्याने आणि जास्त पावसाने मुळाच्या आजुबाजुची पोषके वाहुन जातात म्हणुनही कमतरता भासू शकते. गरम तापमान किंवा दुष्काळी परिस्थितीत पाण्याचे आणि पोषकांचे वहन झाडात होत नाही. स्फुरद, मॅग्नेशियम आणि लोहची उच्च पातळी पालाशाशी स्पर्धा करू शकतात. पाण्याच्या वहनात, पेशी मजबुत रहाण्यात आणि वातावरणासोबत वायुंचे आदानप्रदान करण्यात पालाशची महत्वाची भूमिका आहे. जरी नंतर झाडांना पालाश पुरविले गेले तरीही पालाश कमतरतेची लक्षणे अपरिवर्तनीय आहेत.