Bradysia matogrossensis
किडा
आपल्या तंबाखूच्या रोपवाटिकेत बुरशीची चिलट आहेत का हे तपासण्यासाठी: रोपांवरुन अलगद हात फिरवल्यास चिलट उडतील. रोपांच्या मुळांपाशी अळ्यांनी खाल्ल्याने नुकसान उद्भवते. अळ्या रोपांची मूळ खातात, ज्यामुळे झाडांची वाढ चांगली होत नाही, ती मरगळतात, पिवळी पडतात, पानगळ होते आणि अखेरीस वाळतात.
बॅसिलस थुरिंगिएनसिसने रोपांची आळवणी करा. ह्यामुळे अळ्यांवर नियंत्रण मिळविता येईल.
प्रौढ चिलट दिसल्याने लगेच रसायनिक नियंत्रण करण्याची गरज नाही. जर त्यांची संख्या कमी असेल तर काही मोठी समस्या उद्भवत नाही. जर रोप वाढत्या संख्येने मृत होताना आढळली तरच रसायनांचा वापर करावा. फवारणीद्वारे बुरशीच्या प्रौढ चिलटांचे नियंत्रण केले जाऊ शकते. योग्य कीटनाशकांनी आळवणी केल्याने अळ्यांवर नियंत्रण मिळविले जाऊ शकते. जेव्हा कीटनाशक वा कोणतेही रसायनिक उत्पादन वापरीत असाल तर संरक्षक कपडे वापरणे आणि लेबलावरील सूचना लक्षपूर्वक वाचणे महत्वाचे आहे. नियम देशा-देशात वेगळे असतात, म्हणुन आपल्या भागातील मार्गदर्शनाचे पालन करावे. ह्यामुळे सुरक्षेची खात्री राहून यशस्वी वापराचा संभव वाढतो.
पाणी साचलेल्या ठिकाणी चिलट फोफावतात, खासकरुन जिथे वाळलेला पाचाोळा आणि सेंद्रीय सामग्री गोळा होते. म्हणुन रोपवाटिकेत बियाणे ऊगवल्यानंतर, साचलेल्या पाण्यावर, तरंगत्या ट्रेंमध्ये रोप वाढविली जातात, तिथे बुरशीची चिलट सर्वसामान्यपणे आढळतात. प्रौढ चिलट तरंगत्या ट्रेंमध्ये अंडी घालतात, बहुधा जेव्हा ऊगवल्यानंतर रोप कोवळी असतात. अळ्या अत्यंत बारीक, पारदर्शी किंवा पांढरट रंगाच्या असुन चमकदार काळे डोके असते. नुसत्या डोळ्यांनी त्यांना शोधण कठिण असते पण मुळांच्या आजुबाजुच्या मातीत आपणांस अगदी बारीक असे ठिपके हलताना दिसतील.