Deporaus marginatus
किडा
प्रौढ भुंगे कोवळ्या पानांचे पृष्ठभाग खातात, ज्यामुळे ती पाने तपकिरी होतात, मुडपतात आणि चुरगळ्यासारखी दिसतात. भुंग्यांनी संक्रमित केलेल्या झाडांचे बोडके शेंडे दूरवरुनही सहज दिसतात. झाडाखाली कोवळ्या पानांचे तुकडे पडलेले असतात. शरद ऋतुतील कोंबाना झालेल्या नुकसानामुळे मुळे विकसित होण्यास खूप वेळ लागतो आणि नविन कलमे यशस्वी होण्याचा दरही कमी होतो. ह्यामुळे प्रभावित फांद्यातील फळे योग्य विकसन करण्यास सक्षम नसतात, ज्यामुळे बागेचे एकुणच उत्पादन कमी भरते.
आंब्याची पाने कातरणाऱ्या भुंग्याचे नियंत्रण करण्यासाठीचा पर्याय हा प्रतिबंधक उपाय आणि शेतीच्या चांगल्या सवयींपुरताच मर्यादित आहे.
स्थानिक नियमांप्रमाणे, डेल्टामेथ्रिन आणि फेनव्हलरेट सारखी कीटकनाशके वापरुन कोवळ्या कोंबांना भुंग्यांच्या हल्ल्यापासुन वाचविले जाऊ शकते. जेव्हा पाने कोवळी असतात तेव्हाच पाने आणि कोंबांचे रक्षण करण्यासाठी कीटनाशकांचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. लक्षात घ्या कि वारंवार होणारा पाऊस आणि आंब्याच्या झाडांची उंची ह्यामुळे ह्या फवारणीचा प्रभाव कमी होऊ शकतो. हे भुंगे चांगलेच उडु शकतात आणि पावसाने कीटनाशक वाहून गेले कि परत येतात, म्हणुन सातत्याने लक्ष ठेवणे गरजेचे असते. जेव्हा कीटनाशक वा कोणतेही रसायनिक उत्पादन वापरीत असाल तर संरक्षक कपडे वापरणे आणि लेबलावरील सूचना लक्षपूर्वक वाचणे महत्वाचे आहे. नियम देशा-देशात वेगळे असतात, म्हणुन आपल्या भागातील मार्गदर्शनाचे पालन करावे. ह्यामुळे सुरक्षेची खात्री राहून यशस्वी वापराचा संभव वाढतो.
आंब्याच्या पानांना कातरणारा भुंगा हा मूळचा उष्णकटिबंधीय आशियातील, पाकिस्तान, भारत, बांगलादेश, म्यानमार, थायलंड, मलेशिया आणि सिंगापूर देशात सापडतो. आंब्याच्या पानांना कातरणारा भुंगा हा आंब्याच्या नविन पालवीवरील विनाशकारी उपद्रव आहे. भुंग्यांच्या प्रौढ माद्या कोवळ्या पानांवर अंडी घालुन पानांना कापुन टाकतात, ज्यामुळे ती पाने जमिनीवर पडतात. सुमारे अकरा दिवसांनी, पडलेल्या पानांवरील अळ्या पानांना सोडतात आणि जमिनीतच प्रौढ होतात. जेव्हा हे प्रौढ बाहेर येतात हे चक्र पुन्हा चालू होते.