आंबा

पाने मुडपणारा भुंगा

Apoderus tranquebaricus

किडा

थोडक्यात

  • टोकाची पाने मुडपतात, गोळा होतात आणि वाळतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

आंबा

लक्षणे

जेव्हा झाडे प्रभावित होतात, तेव्हा त्यांची पाने टोकापासुन गोळा होतात, ज्यामुळे ती मुडपल्यासारखी दिसतात. प्रौढ भुंग्यांमुळे मुडपणे होते. भुंगे आंब्याच्या पानांना कापतात आणि आकार देतात ज्यामुळे ती टोपणासारखी सहजपणे गुंडाळली जातात. ही गुंडाळली गेलेली पाने मुख्या पानांना जुडलेलीच रहातात. ह्या गुंडाळलेल्या पानांच्या आत भुंग्यांच्या छोट्या अळ्या पानांचे भाग खात बसतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

हा आंब्यावरील छोटा उपद्रव आहे. गुंडाळलेली पाने हाताने काढणे ही पद्धत सर्वोत्कृष्ट आहे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक/पर्यावरणीय पोषण उपचार पद्धतीचा वापर करा. किड्यांची संख्या कमी असल्यास झाडांना जास्त नुकसान होत नाही. ह्यावरील लिखाणाप्रमाणे, बराच प्रादुर्भाव झाला असता मोनोक्रोटोफॉस आणि एंडोसल्फानसारख्या कीटनाशकांच्या वापराने नुकसान कमी करता येते.

कशामुळे झाले

आंब्याचे पान मुडपणार्‍या भुंग्यांमुळे आंब्याच्या झाडास नुकसान होते. हा उपद्रव रोपवाटिकेत आणि मुख्य शेतातही असतो. जांभुळ, चवळी, फणस, काजू, टीक, पेरू आणि नीमसारख्या इतर झाडांनाही प्रादुर्भावित करतो. अलिकडेच २०२३मध्ये असे दिसुन आले आहे कि, बदामाच्या झाडावरही ह्याला पाहिले गेले आहे. ह्या किड्याच्या जीवनचक्राचे विविध टप्पे आहे: अंडी, अळ्यांचे पाच टप्पे, कोष आणि प्रौढ. मुडपलेल्या पानांच्या बाहेरच्या बाजुने प्रौढ एकेक करुन अंडी घालतात. मादी भुंगा चिकट द्रवही सोडते ज्याने अंडी पानांच्या पृष्ठभागाला चिकटुन रहातात. अंडी चमकदार पिवळ्या रंगाची असतात. अळी जी भुंग्याचे बाल आणि अपक्व रुप असते ती पिवळसर रंगाची असते. ती गुंडाळलेल्या पानांच्या आतील भाग खाते, ज्यामुळे प्रभावित पानांना नुकसान होते. प्रौढ भुंगे लालसर तपकिरी असतात आणि लांब सोंड असते. ज्याने ते आंब्याच्या पानांना कापुन मुडपुन सुरळ्या करतात. गुंडाळी झालेली पाने मुख्य पानांना जुडलेलीच रहातात. उबदार तापमान, अधिक पाऊस आणि जास्त आर्द्रता ह्यामुळे पाने मुडपणारा भुंगा आंब्याच्या झाडाला प्रादुर्भावित करण्याचा संभव जास्त असतो.


प्रतिबंधक उपाय

  • लक्षणांसाठी लक्ष ठेवा.
  • प्रादुर्भावाच्या परिस्थितीत, नुकसानीत पाने हाताने काढा.
  • पानांच्या गुंडाळीत अळ्यांना शोधुन चिरडा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा