काकडी

काकडीवर्गीयांवरील वास सोडणारा किडा

Coridius janus

किडा

थोडक्यात

  • पाने पिवळी पडतात.
  • फळांवर आणि खोडांवर बारीक खोलगट भाग दिसतात.
  • झाडाची वाढ प्रभावित होते.

मध्ये देखील मिळू शकते

5 पिके
कारले
काकडी
खरबूज
लाल भोपळा
अधिक

काकडी

लक्षणे

वास सोडणारे किड्यांचे प्रौढ आणि पिल्ले दोन्ही झाडांतील रस शोषण करुन नुकसान करतात. रस शोषण केलेल्या जागी पाने पिवळी पडतात आणि फांद्या तसेच फळांवरही खोलगट भाग दिसतात. झाडाची वाढ एकुणच खुंटते. उत्पादन कमी भरते. जिथे वास सोडणारे किडे मोठ्या संख्येने असतात तिथे लहान झाडांना व कोवळ्या भागांच्या वाढीला नुकसान होते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

किड्यांचे नैसर्गिक भक्षकही आहेत, पण ह्यांनी सोडलेल्या तीव्र वासाने भक्षकांविरुद्ध चांगला प्रतिकार होतो. नैसर्गिक पायरेथ्रिन किंवा नीम तेलासह इसेन्शियल तैल मिश्रण उत्पादने वापरा. रसायनिक नियंत्रण भागात दिलेली तत्वे इथेही लागू होतात. फवारणी पद्धतीसह पिकांचे लक्षणांसाठी निरीक्षण करणे तसेच सापडल्यास किडे आणि अंड्यांना काढुन टाकणे असे ही करा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास अधिक पर्यावरणीय जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जास्त प्रादुर्भाव झाल्यास आपल्या भागात या कारणांसाठी संमत असलेल्या स्पर्शजन्य कीटनाशकांची फवारणी करा. सकाळी जेव्हा प्रौढ कार्यरत असतात तेव्हाच फवारणी करा आणि फवारणी थेट मुळांकडे तसेच पानांच्या खाली करा. जर आपण पाल्यापाचोळ्याचे आच्छादन वापरत असतात तर त्यावर पाणी फवारा ज्यामुळे किडे लपायच्या जागेतुन बाहेर पडतील मग त्यांवर औषध फवारणी करा.

कशामुळे झाले

कोरिडियस जानुस नावाच्या वास सोडणार्‍या किड्यांमुळे नुकसान उद्भवते. हे किडे बहुधा काकडीवर्गीय झाडांवर आढळतात. प्रौढावस्थेतील किडे झाडाच्या कचर्‍यात आणि तणांत विश्रांती घेतात. प्रत्येक मादी सुमारे १०० अंडी पानांच्या खालच्या बाजुस, फांदीवर वा यजमान झाडाच्या इतर भागात घालते. प्रौढ उडू शकत नाहीत आणि त्यांचे डोके काळे असुन शरीर नारिंगी रंगाचे व पंख काळे असतात. किड्यांना पाल्यापाचोळ्यात लपायला आवडते. ते सकाळी आणि संध्याकाळी कार्यरत असतात पण दिवसा मात्र पानांखाली आश्रय घेतात.


प्रतिबंधक उपाय

  • वाढीच्या काळात पाला पाचोळ्याचे आच्छादन काकडीवर्गीय झाडांच्या जवळ करु नका कारण ह्यामुळे स्क्वॅश किड्यांना लपायला जागा मिळते.
  • शेतात निरीक्षण करून किडे आणि अंडी नष्ट करा जेणेकरुन भविष्यातील नुकसान टाळता येईल.
  • आधीच्या वर्षी शेताच्या ज्या भागात वास सोडणारे किडे आढळले होते, त्या भागावर जास्त लक्ष ठेवा.
  • प्रौढ, अळ्या किंवा अंडी आढळली कि त्यांना वेचून नष्ट करा.
  • किड्यांना हाताने नष्ट करण्यापूर्वी नेहमीच हातमोजे वापरत चला कारण किडे चुरडल्यानंतर अत्यंत घाण वास येतो.
  • किड्यांना लपुन जगण्यासाठी कारणीभूत असलेला झाडाचा कचरा शेतात राहू देऊ नका.
  • काढणीनंतर जमिनीची चांगली मशागत करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा